Tarun Bharat

शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आसल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारताने काहीच गमावलेले नाही, असे देखील सिंह यांनी यावेळी सांगितले.


राजनाथ सिंह म्हणाले, भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही. सप्टेंबर 2020 पासून भारत आणि चीनमध्ये वाद निवळण्यासाठी चीनसोबत विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात सहमती झाली आहे. दोन्ही देशाच्या सैन्यांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. चीन फिंगर 8 आणि भारत फिंगर 3 या सीमेवर असेल. भारत-चीन सीमेवर पूर्वीसारखी स्थिती बनवण्यात येईल. सध्या पेट्रोलिंग बंद असेल. द्विपक्षीय स्तरावर चर्चेनंतरच एलएसीवर पेट्रोलिंग केलं जाईल. काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतमतांतर कायम असून त्यावर चर्चा सुरू आहे.


पाकिस्तानने बेकायदपणे भारताची भूमी चीनला दिली. त्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. चीनने भारताच्या 43 हजार वर्ग किलोमीटर अशा मोठया भूभागावर दावा सांगितला आहे. पण आम्ही त्यांचे दावे कधीच मान्य केले नाहीत, असे देखील राजनाथ सिंह म्हणाले. एलएसीवरील आताची परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेणार असून कुठल्याही स्थितीत तणाव निर्माण होईल असे वर्तन सैन्याकडून होणार नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

datta jadhav

रत्नागिरीत कोरोनाचे आणखी 62 रुग्ण

Archana Banage

‘ते’ सिनेमातले बंटी-बबली; फिल्मी स्टंटबाजीने आम्हाला फरक पडणार नाही

datta jadhav

पाकमध्ये क्षेपणास्त्र कोसळल्याप्रकरणी कारवाई

Patil_p

”मी खोटं बोलत नाही कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही”

Archana Banage

देशात 24 तासात 6088 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav