Tarun Bharat

शांताई वृद्धाश्रमातर्फे आशा कार्यकर्त्यांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना काळात उत्तम सेवा केलेल्या 35 आशा कार्यकर्त्यांचा शांताई वृद्धाश्रम येथे सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच शांताईमधील आजी-आजोबांसह कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात आले.

वृद्धाश्रमाचे संचालक ऍलन मोरे, वसंत बालिगा, संतोष ममदापूर, नागेश चौगुले, मारिया मोरे यांच्या हस्ते आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुनियाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, प्रकाश धोंगडी, अशोक कोरे, शिवस्वामी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नागेश चौगुले होते.

पार्वती कुंभार व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. ऍलन मोरे यांनी आभार मानले. शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबा व कर्मचारी अशा  150 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

Related Stories

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली

Amit Kulkarni

आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिवपदी किरण जाधव

Patil_p

नवी गल्ली येथील तरुणाला मारहाण

Patil_p

थिएटर जानेवारीपर्यंत राहणार बंद

Patil_p

विमानतळाने गाठला 30 हजारांचा टप्पा

Patil_p