Tarun Bharat

शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानतर्फे आवळे भोजन, नौकाविहार

Advertisements

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा वार्षिक आवळे भोजन, कालोत्सव व नौकाविहार शनिवारी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नौकेत श्री सप्तकोटिश्वर व श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण यांच्या मूर्ती एकत्र बसवून नौकाविहाराचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी सकाळी मंदिरात अभिषेक, आरत्या झाल्यावर पालखी मिरवणुकीने तळीच्या ठिकाणी प्रस्थान केले. त्यानंतर आटोपशीर पद्धतीने पारंपरिक विधी, अभिषेक, आरत्या आणि महाप्रसाद तोही केवळ उत्सवाचा एक भाग असल्याने देवाला नैवेद्य दाखविण्यापुरता झाला. कोविडमुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाविकांचीही उपस्थिती अत्यल्प होती.

Related Stories

पंचायत निवडणुकीत भाजपच्या विरोधी मतदान करा : विजय सरदेसाई

Amit Kulkarni

ठरावाआधीच दोन वाहनांची खरेदी मडगाव पालिकेची नवी करामत

Amit Kulkarni

पुढील पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची!

Amit Kulkarni

मांद्रे मतदारसंघात काँग्रेसतर्फे ऍड. रमाकांत खलप लढणार?

Amit Kulkarni

खंडणीप्रकरणी धर्मेश सगलानीला अटक

Amit Kulkarni

पडोसे प्रकल्पात लवकरच अत्याधुनिक यंत्रणा बसविणार

Omkar B
error: Content is protected !!