Tarun Bharat

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर

Advertisements

कुंकळ्ळी बाजारातून मंदिरात मिरवणुकीने आगमन

प्रतिनिधी /कुंकळ्ळी

तलवडा, वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर पडली असून हा रथ इडगुंजी, कुमठा येथील कारागीर गंगाधर आचारी व त्यांच्या इतर सहकाऱयांनी बरीच मेहनत घेऊन तयार केला आहे. या रथासाठी जवळपास 30 लाख रु. खर्च झाले आहेत. गुरुवारी या रथाचे सुटे भाग ट्रकवर टाकून तो शुक्रवारी पहाटे कुंकळ्ळीत पोहोचला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी बँडवादनाच्या तालावर कुंकळ्ळी बाजारातून श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण मंदिराच्या ठिकाणी सदर रथ मिरवणुकीने नेण्यात आला.

कुंकळ्ळी बाजारात देवस्थानचे अध्यक्ष गौरीश फडते, सचिव महेश देसाई व खजिनदार दामोदर देसाई यांनी रथाचे स्वागत केले. यावेळी माजी अध्यक्ष शैलेश देसाई, लवू देसाई, रामानंद देसाई, प्रशांत देसाई, शैलेश फडते, निवास देसाई, अविराज फडते, अबी उदेकर, प्रज्वल शेटकर, सचिन उदेकर, गौरीश शेटकर, आशिष फडते, शाबा गावकर व अन्य महाजन, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. याआधी संस्थानात अष्टदिकपाल व विजयरथ असून त्यात आता महाब्रह्मरथाची भर पडली आहे. उत्सव काळात रथात देवीच्या मूर्तीला आरूढ करून मिरवणूक काढण्यात येते. संस्थानच्या साजऱया होणाऱया वार्षिक कालोत्सव तथा जत्रोत्सवात हा महाब्रह्मरथ आकर्षण ठरणार आहे. हा रथ तयार करण्यात भाविकांचे मोठे आर्थिक साहाय्य लाभले आहे. या सर्वांचे अध्यक्ष गौरीश फडते यांनी आभार मानले आहेत. कोविड महामारीमुळे मागील वषी रथ आणला गेला नाही. सध्या महामारी बऱयाच प्रमाणात आटोक्मयात आली असून त्यामुळे यंदा नियमांचे पालन करून मंदिरातील उत्सव साजरे करणे शक्य होईल, असे फडते यांनी सांगितले.

Related Stories

पक्षाशी एकसंध राहणार

Amit Kulkarni

भविष्यात काँग्रेसच्या आमदारांनी पक्षांतर केले तर गट समित्या जबाबदार ठरतील

Amit Kulkarni

चोर्ला घाटात ट्रकच्या टायर्सना आग

Amit Kulkarni

पेडणेतील ‘ती’ शौचालये स्थलांतरीत की चोरी?

Amit Kulkarni

नितीन कुंकळय़ेकर सलग तिसऱयांदा मेटच्या अध्यक्षपदी

Patil_p

अरविंद केजरीवाल म्हणजे ‘छोटा मोदी’; रणदीप सुरजेवाला यांची टीका

Abhijeet Shinde
error: Content is protected !!