Tarun Bharat

शारदोत्सवच्या ऑनलाईन काव्य शाळेत डॉ. संध्या देशपांडे आज विचार मांडणार

प्रतिनिधी/ बेळगाव

शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन काव्य शाळेत दि. 11 रोजी डॉ. संध्या देशपांडे या ‘भाव कविता’ या विषयावर बोलणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे….

डॉ. संध्या देशपांडे एमए पीएचडी असून एमएला मराठी विषयात विद्यापीठात त्या प्रथम आल्या होत्या. जीएसएस व आरपीडी कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून काम करून त्या निवृत्त झाल्या. संत साहित्य आणि मराठी नाटक हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. एकांकिका : स्वरुप आणि दिशा या प्रबंधास व प्रायोगिक रंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीची प्रयोगशाळा आहे, या प्रबंधास पुण्याचा भगवान पंडित पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अश्रद्ध, सुलतान, बी पॉझिटिव्ह या त्यांच्या कादंबऱया असून अंत:स्थ, जीना इसी का नाम, मेघ बंधन, कहाणी गोमुक्ती संग्रामाची ही नाटके आहेत. गाणगंगा हे गंगुबाई हणगल यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. चंद्रशेखर कंबारांच्या ‘सीरी संपीगे’चा चाफा या नावाने तर डी. एस. चौगुले यांच्या दिशांतर नाटकाचा त्याच नावाने अनुवाद केला आहे. बसवेश्वरांच्या 200 वचनांचा त्यांनी अनुवाद केला असून तिची कथाच वेगळी हा त्यांचा कथासंग्रह आहे. अनेक विषयांवर त्यांनी पथनाटय़े लिहिली आहेत.

विंदा, कुसुमाग्रज, कृ. ब. निकुंब, इंदिरा संत व रामाणी, गदिमा आणि सुधीर फडके, मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यांवर आणि काव्यांवर त्यांनी अनेक कार्यक्रम बसविले आहेत. त्यांना वूमन अचिवर्स अवॉर्ड, नाटय़ भूषण बेळगाव पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार-मुंबई व सीरीगन्नड राष्ट्रीय प्रति÷ान पुरस्कार मिळाले आहेत. 

Related Stories

आंतरजिल्हा प्रवासातूनही युवकाला कोरोना

Tousif Mujawar

मिनी ऑलिम्पिक ऍथलेटीक्समध्ये डायनॅमिक क्लबच्या खेळाडूंचे यश

Amit Kulkarni

उचगावात पारायण सोहळय़ाची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

येळ्ळूर प्रवेशद्वाराजवळील ‘तो’ कचरा हटवा ग्रामपंचायतने लक्ष देण्याची विद्यार्थ्यांची मागणी

Omkar B

स्मार्ट सिटीच्या अंदाधुंद कामाचा रहिवाशांना फटका

Amit Kulkarni

बबन भोबे मित्रमंडळातर्फे फराळाचे वाटप

Amit Kulkarni