रोज उठताना-बसताना-चालताना आपण आपल्या संतुलनाविषयी जास्त विचार करीत नाही. परंतु संतुलन राखण्यासाठी आपल्या मेंदूला बरीच कसरत करावी लागते. शरीराच्या अनेक जटिल तंत्रांकडून माहिती मेंदूपर्यंत पोहोचते, जे मिळून शरीराचे संतुलन टिकवून ठेवतात. या तंत्रांमध्ये थोडी जरी गडबड झाली तर असंतुलनाची स्थिती निर्माण होते. शरीराचे संतुलन टिकवून ठेवण्यात मददगार अशा काही तथ्यांची आपण येथे माहिती पहाणार आहोत.


संतुलनात कानाची भूमिका
कान फक्त ऐकण्याचीच नव्हे तर संतुलन
टिकविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. अंतर्कानात असलेल्या अनेक संरचना स्थान आणि संतुलनासंबंधी संकेत मेंदूपर्यंत पोहोचवितात. डोक्मयाची सरळ गती
(वर-खाली, डावी-
उजवीकडे) आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी संदेशासाठी
दोन संरचना युट्रिकल आणि सॅक्मयुल जबाबदार असतात. अन्य कुंडलीसारख्या
संरचना, ज्यामध्ये द्रव पदार्थ भरलेला असतो. डोक्मयाच्या गोलाकार गतिशी संबंधित संदेश मेंदूपर्यंत पोहोचविते.
जर आंतरकर्णात काही क्षती असेल तर शरीराचे संतुलन बिघडू लागते. उदा. आंतरकर्णामध्ये कॅल्शियम क्रिस्टल्स चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यावर मेंदूला असा संदेश मिळतो की, डोके हलत आहे. वास्तविक डोके स्थिर असते, ज्यामुळे चक्कर येते.
मांसपेशी सांधा आणि त्वचा
वेस्टिब्युलर डिस ऑर्डर असोसिएशनच्या मते मांसपेशी सांधे, अस्थिबंध आणि त्वचेमध्ये असलेल्या संवेदना ग्राहीसुद्धा स्थानासंबंधीची माहिती मेंदूपर्यंत पोहचवितात. पायाचे तळवे किंवा पाठीचे संवेदनाग्राही दबाव किंवा खेचण्याविषयी संवेदनशील असतात.
मानेमध्ये असलेले ग्राही मेंदूपर्यंत डोक्मयाची स्थिती व दिशेविषयी संदेश पोहचवितात तर टाचेत असलेले ग्राही जमिनीच्या सापेक्ष शरीराच्या गतिविषयी सांगतात. नशेमध्ये मेंदूला अवयवांची स्थिती शोधण्यात अडचण येते. त्यामुळे नेहमी ही तपासणी करण्यासाठी गाडीचालक नशेमध्ये आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलीस परीक्षणात चालकाला आपल्या नाकाला स्पर्श करायला सांगतात.
वाढत्या वयात संतुलन
संतुलन टिकविण्यात नजर, वेस्टीबुलर तंत्र आणि स्थानासंबंधी संवेदी तंत्रही महत्त्वाचे असतात. जसजसे वय वाढत जाते. शरीराच्या अवयवाबरोबर ही तंत्रेही कमजोर होऊ लागतात आणि पडण्याची शक्मयता वाढते.
चालण्याची जाणीव होणे
समजा आपण रेलगाडीत बसला आहात आणि खिडकीतून बाहेर पहात आहात, तेव्हा अचानक आपणाला जाणवू लागते की, आपली रेलगाडी चालू लागली आहे. वास्तविक ती स्थिर असते. या स्थितीला वेक्शन म्हणतात. वेक्शनची स्थिती तेव्हाच बनते, जेव्हा मेंदूला प्राप्त होणारी माहिती आपसात मेळ खात नाही. उदा. रेलगाडीच्या बाबतीत डोळे खिडकीतून दृश्य मागे जाताना पहातात आणि मेंदूला गती होण्याचा संदेश पाठविते. परंतु मेंदूला शरीरातील अन्य संवेदना ग्राहीकडून गतीशी संबंधित कोणताही संकेत मिळत नाही, आणि भ्रमाची स्थिती निर्माण होते. अर्थात दुसरीकडे पाहिल्यावर हा भ्रम नाहिसा होतो.
मायग्रेन
मायग्रेनने पीडित लोकांपैकी सुमारे 40 टक्के लोक संतुलन बिघडणे किंवा चक्कर येण्याच्या समस्येचाही सामना करतात. या समस्येला मायग्रेन- संबंधी व्हर्टिगो म्हणतात. समस्येचे खरे कारण अजून समजलेले नाही, परंतु एक संभावित कारण असे आहे की, मायग्रेन मेंदूच्या संकेत प्रणालीला प्रभावित करीत असावा. त्यामुळे मेंदूची डोळे, कान आणि पेशींकडून येणारे संवेदी संकेत समजून घेण्याची गती संथ होते आणि म्हणून चक्कर येतात. याचे आणखी एक संभावित कारण हे सांगितले जाते की, मेंदूमध्ये एखाद्या रसायनाचा स्त्राव वेस्टीबुलर तंत्राला प्रभावित करतो, त्यामुळे चक्कर येते.
प्रवासाची जाणीव होणे
अनेक लोकांना विमान किंवा टेनमधून उतरल्यावरही ही जाणीव होते की ते अजूनही विमान किंवा टेनमध्ये बसले आहेत. सामान्यपणे ही जाणीव काही तास किंवा एक दिवसात निघून जाते. परंतु काही लोकांमध्ये ही जाणीव अनेक दिवस महिने किंवा वर्षापर्यंत टिकून रहाते. ‘याचे एक कारण हे मानले जाते की, याने पीडित लोकांच्या मेंदूच्या मेटाबोलिज्म आणि मेंदूच्या गतिविधीमध्ये असे बदल होतात जे शरीराला हलत्या-डुलत्या परिस्थितीशी ताळमेळ घालण्यात मददगार ठरतात. परंतु सामान्य स्थितीत परतल्यावर असे काही होत नाही.