Tarun Bharat

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची 5 दिवस ‘ऑनलाईन’ सुट्टी!

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्र राज्यातील शाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने यंदा शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची ऑनलाइन सुट्टी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे सुट्टीच्या कालावधीत कोणतीही परीक्षा घेऊ नये असे देखील राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 


सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांना दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही असा मोठा प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर होता शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर होण्याची घोषणा नुकतीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती त्यानुसार राज्य सरकारकडून गुरुवारी तारीख जाहीर करण्यात आली. 


या कालावधीत इयत्ता पहिली ते बारावी चे ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या अध्यापनाचे कामकाज बंद राहील असे सरकारकडून परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे सुट्टीच्या काळात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांची कुठलीही परीक्षा घेऊ नये असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. 


दरम्यान, दरवर्षी दिवाळीची 15 दिवस सुट्टी असते. यंदा शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्याने केवळ पाचच दिवस म्हणजेच 12 ते 16 नोव्हेंबर सुट्टी देण्यात आली आहे. केवळ पाचच दिवस सुट्टी मिळालेल्याने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे. 

Related Stories

फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरडय़ांना बाधा

Patil_p

शरद पवारांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली?

datta jadhav

अक्कलकोट : शिस्तीसाठी महसूल प्रशासनाची दंडात्मक कारवाई

Archana Banage

भारत जोडो यात्रा देश जोडणारी; काँग्रेसपुरती संकुचित नाही

datta jadhav

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage

अन वाईच्या भाजी विक्रेत्यांनी केली स्वयंम स्फूर्तीने अँटीजेन टेस्ट

Patil_p