Tarun Bharat

शाळकरी मुलावर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय महिलेला 20 वर्षांचा तुरुंगवास

ऑनलाईन टीम / हैदराबाद

हैदराबाद येथे शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय युवतीला पोलीसांनी केली अटक. मिळालेल्या माहितीनुसार ज्योति उर्फ मंजुळा या नावाची युवती हैदराबाद येथे लहान मुलांच्या शाळेत केअर टेकर म्हणुन काम करते. या 27 वर्षीय तरुणीने त्याच शाळेतील लहान मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत.या प्रकरणामध्ये चंद्रयानगुट्टा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलाच्या वडिलांनी मुलाच्या अंगावर भाजल्याचे चटके पाहिल्यानंतर मुलाकडे विचारपुस केले असता हा प्रकार समोर आला आहे.

ही महिला नुकतीच शाळेत कामाला लागली होती. आणि नेहमीच ती आपल्यासोबत अशी वर्तवणूक करते असं या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं. तसेच घडलेल्या प्रकारासंदर्भात कुठेही वाच्यता करायची नाही. या बद्दल कुठेही बोललास तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी या महिलेने मुलाला दिली होती. या महिलेने मुलाला सिगारेटचे चटकेही दिल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. हा घटना क्रम ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने या अत्याचार प्रकरणी तरुणीला दोषी ठरवत २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला २० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Related Stories

मेन्यूकार्डातून समजणार खाद्यपदार्थातील उष्माक

Patil_p

केंद्र व राज्य शासनाचे कर्तृत्व संपल्याने जातीयवाद

Patil_p

केदारनाथ धामची कवाडं उघडली

datta jadhav

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Tousif Mujawar

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामांचा त्वरीत निपटारा करण्याची शिवसेनेची महाराष्ट्र बँकेकडे मागणी

Archana Banage

सह्याद्री देवराई वनराई प्रकल्प देशाला रोल मॉडेल ठरेल

Abhijeet Khandekar