Tarun Bharat

शाळांजवळच्या घरांना मागणी

बांधकाम क्षेत्रात घरांच्या मागणीत गेल्या वर्षी फारशी समाधानकारक वाढ झालेली नाही. तरीही या क्षेत्राची वाटचाल सुरूच असून सवलतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. याच अनुषंगाने घर घेणाऱयांचा एक कल पाहिला असता अनेकांना शाळेजवळची घरे घेणे पसंत पडू लागले आहे. शाळांजवळच्या घरांना मागणी वाढताना दिसते आहे.

 घर शोधण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र मार्ग व विचार असतो. आपल्या सोयी, पसंतीनुसार आवडीच्या ठिकाणी घर घेण्याचा एक ट्रेंड आहे. याखेरीज काहीजण मुख्य रस्त्य़ानजिक ते घेण्यात धन्यता मानतात. तर काहीजण बसस्थानकाजवळ घर घेण्यावर भर देतात. काहींना रोजच्या गाडय़ांच्या वर्दळीच्या परिसरात घर घेणे पसंत पडत नाही. त्यांना शांत, निवांत शहराच्या गजबजाटापासून लांबवरच्या उपनगरात घर घ्यायचं असतं. प्रत्येकाचा यामागे वेगळा दृष्टीकोन असतो, हे सत्य.

 सध्याचा ट्रेंड हा जरा वेगळा दिसून आला आहे. एका निरीक्षणात घरांच्या मागणीचा विचार केला असता अनेकांनी शाळांजवळच्या घरांना पसंती दर्शवलीय. शैक्षणिक संस्था असलेल्या परिसरात राहतं घर घेण्याला जास्ती प्राधान्य दिलं जात आहे.

 आताच्या घडीला शहराची होणारी घुसमट, वाहतुकीचा ताण याला रहिवासी कंटाळले आहेत. रोजच्या या जीवनशैलीचा कंटाळा अनेकांना वाटू लागला आहे.        दूरवर घर घेतानाही ते सुरक्षित ठिकाणी घ्यावं लागतं. आजकाल खरेदीदार शाळा असणाऱया परिसरात घर घेण्याचा विचार करत आहेत. कामाचे ऑफिस आणि शाळा या दोन्ही बाबी घराजवळ असाव्यात. चांगली शाळा जवळ असणाऱया भागात घर घेण्याला पसंती दिली जात आहे.

 आज अनेक शाळा सुरक्षेच्या दृष्टीने मुलांकरीता बसची सोय करतात. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत सकाळी सोडतात आणि संध्याकाळी आणतात. अनेक शाळा क्रीडा, संगीतसारख्या कलांसारख्या गोष्टींवर भर देत असतात. त्यामुळे शाळांच्या वाढत्या उपक्रमाचा अंदाज पाहता शाळा जवळ असणेच रहिवासांना सोयीचे वाटते. म्हणजे मुलांना ने आण करण्यासाठी जास्त धडपडावे लागणार नाही. शाळेजवळ घर असणं पालक, मुलांच्या सोयीचंच असतं. शाळांनाही जवळपासच्या मुलांना प्रवेश देणं सोयीचं वाटतं. एवढंच नाही तर अनेकविध शाळा घरासमीप असतील, असे ठिकाण राहण्यासाठी निवडलं जात आहे. पायाभूत सुविधा, कॉम्प्लेक्समध्ये सर्व गोष्टी मिळण्याची सोय असायला हवी. डेव्हलपर्सही सार्वजनिक बसव्यवस्था आणि शाळा असणाऱया भागात प्रकल्प राबवण्यास उत्सुक असतात.

Related Stories

बजेट-2020 : बांधकाम उद्योगाच्या वाढल्या अपेक्षा

Patil_p

गृहकर्ज थकलं…काळजी नको….

Patil_p

डॉ. सतीश नाईक अपूर्व संस्कृत सोहळा!

Patil_p

करिअर डायरी

Patil_p

स्टेट बँकेची मेगा भरती

Patil_p

डेव्हलपमेंट स्टडीज एक नवखी वाट

Patil_p