Tarun Bharat

शाळांमधील विद्यार्थ्यांना गडकिल्यांचा इतिहास सांगा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे युवा सेनेला आवाहन

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

स्वराज्य स्थापनेत गडकिल्ल्यांना अतिशय महत्व होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले मजबूत केले होते. गडकिल्ल्यांच्या स्पर्धेतून ही परंपरा तरूण पिढीपुढे आणत आहे, याचा आनंद आहे. ऐवढ्यावरच थांबून चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचा इतिहास शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना केले.

कोल्हापूर युवासेना व कै. रामभाऊ चव्हाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कडकिल्ले स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 100 हून अधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. परिक्षणावेळी यातील काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत त्यांनी तयार केलेल्या किल्ल्याची माहिती सांगितली. यातील उत्कृष्ट किल्ल्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मंत्री सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास पुढे नेण्याचे काम चित्रपट, मालिका, पुस्तक, ग्रंथ करीत आहेत. परंतु, दीवाळीत रायगड, राजगड, पन्हाळगड, विजयदुर्ग अशा किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिमा साकारून किल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्याची उर्मी या युवा स्पर्धकांमध्ये आहे. लहान वयापासून स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचा अभ्यास केल्याने भविष्यात इतिहास समजून घेणे अवघड जात नाही. किल्ल्यांची इथंभूत माहिती जाणून घेऊन आचरणात आणली पाहिजे. शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी गडकिल्ल्यांच्या स्पर्धांचे कौतुक केले. तसेच युवा सेनेच्या माध्यमातून होणार्‍या सर्व स्पर्धा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रास्ताविक युवासेना जिल्हाप्रमुख मनजित माने यांनी केले. यावेळी खासदार धर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्लास पाटील, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महिला उपजिल्हा प्रमुख स्मिता मांडरे-सावंत, पुनम पाटील, स्वेता चितारे, वैभव जाधव, मंगेश चितारे, अवदेश करंबे, आदी उपस्थित होते.

गडकिल्ल्यांच्या स्पर्धेतील विजेते

प्रथम : महाकाली भजनी मंडळ, (किल्ला कुलाबा)
द्वितीय : हिंदवी ग्रुप विचारे माळ (किल्ला राजमाची)
तृतीय : देखो ग्रुप मंगळवार पेठ, (पन्हाळा)
उत्तेजनार्थ : बाल मित्र वारीअर्स मुक्तसैनिक, (किल्ला पन्हाळा)
उत्तेजनार्थ : न्यू ग्रुप महालक्ष्मी कॉलनी आपटे नगर (किल्ला शिवनेरी)

Related Stories

गावरान कोंबडी दहावेळा पारखून घ्यायची वेळ

Abhijeet Shinde

वीज दरात कपात; राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : थकीत घरफाळा, पाणीपट्टीसाठी पाणी कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेला पोलीस संरक्षणात सुरुवात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बाप्पांची ‘दुवा’ आणि शाहूपुरी युवक मंडळाची ‘दवा’

Abhijeet Shinde

डॉ. दशरथ काळे आणि मिलिंद शिंदे महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परीनिरीक्षण सेन्सॉर बोर्डावर

Abhijeet Shinde

शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे हे, उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

Abhijeet Shinde
error: Content is protected !!