Tarun Bharat

‘शाळा तिथे मुख्याध्यापकपद’

सूत्र लागू करण्याची शिक्षक भारतीची मागणी

प्रतिनिधी / ओरोस:

शासन निर्णय 28 ऑगस्ट 2015 नुसार विद्यार्थी पटसंख्येअभावी ज्या शाळेचे मुख्याध्यापकपद व्यपगत झाले, त्या प्रत्येक माध्यमिक शाळेला ‘शाळा तिथे मुख्याध्यापकपद’ हे अत्यावश्यक सूत्र लागू करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, सचिव सुरेश चौकेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, राज्य प्रतिनिधी सी. डी. चव्हाण, डी. एस. पाटील, दत्तात्रय मारकड, शिवाजी वांदे, एस. डी. भोसले, अविनाश कांबळे,  स्वप्नल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेही निवेदन पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात शिक्षण आणि शिक्षकांबाबत अतिमहत्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना काही बाबींचा विचार होण्याची विनंती शिक्षक भारतीने केली आहे. काही निर्णयांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना तसेच संस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चुकीच्या निर्णयामुळे शाळास्तरावर शिक्षण व शिक्षण क्षेत्रातील माध्यमिक विभागातील शालेय कामकाज सुरळीतपणे पार पाडणे जिकिरीचे झाले आहे. या निर्णयाचा फटका फक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना नव्हे तर विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास साधण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी ‘शाळा तिथे शारीरिक शिक्षण शिक्षक’पदाला तातडीने मंजुरी द्यावी. 11 डिसेंबरचा शिक्षकेतर कर्मचाऱयांसंदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आकृतीबंध लागू करावा. शाळांना अनुदान देताना 20 टक्के अनुदानित शाळांना तपासणीच्या फेऱयात अडकवून न ठेवता नियमानुसार थेट 40 टक्के अनुदान मंजूर करावे. डोंगरी व आदिवासी भागासाठी 28 ऑक्टोबर 2015 पूर्वीची तरतूद पुन्हा लागू करावी. टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना सेवेत कायम करावे, यासारख्या अनेक मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

Related Stories

नौकेला हर्णे बंदरात जलसमाधी!

Patil_p

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस, आंबा-काजू बागायतदार चिंतेत

Archana Banage

मासे मिळत नसल्याने मच्छीमारी बोटी चार दिवस किनाऱयाला!

Patil_p

रंगपंचमी साधेपणाने, बच्चे कंपनीने लुटला आनंद!

Patil_p

बसस्थानकात भटक्मया कुत्र्यांचा वावर

Patil_p

‘फिट इंडिया’त रत्नागिरी जिल्हय़ाचा चौथा नंबर!

Patil_p