Tarun Bharat

शाळा प्रवेशासाठीची वयोमर्यादा निश्चित

प्ले स्कूल, नर्सरीसाठी तीन प्लस, तर पहिलीसाठी सहा प्लस : 31 डिसेंबर रोजीचे वय धरले जाणार प्रमाण

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून होणार अंमलबजावणी

प्रतिनिधी / ओरोस:

शाळा प्रवेशासाठी मुलांची किमान वयोमर्यादा शासनाने निश्चित केली आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची तीन वर्षे पूर्ण करणाऱया विद्यार्थ्याला प्ले ग्रुप, नर्सरी किंवा पहिली पूर्वीच्या कोणत्याही तिसऱया वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तर 31 डिसेंबर रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण करणाऱया मुलाला पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गातील प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा अनुक्रमे तीन प्लस आणि सहा प्लस अशी निश्चित करण्यात आली आहे.

शाळा प्रवेशाच्या यापूर्वीच्या शासन निर्णयात पहिली प्रवेशासाठी सहा वर्षांची मर्यादा निश्चित केली होती. मात्र पाच वर्षे पूर्ण झालेले बालक पहिली प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल, असे नमूद केले होते. राज्यात सी. बी. एस. ई., आय. सी. एस. ई., आय. बी. अशा विविध मंडळांचा अभ्यासक्रम राबविणाऱया शाळा आहेत. त्यामुळे पहिली प्रवेशासाठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळय़ा दिनांकास ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्ण प्राथमिक शाळा प्रवेशाची अट निश्चित करण्यात आली नव्हती.

दरम्यान शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत एकवाक्यता आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत सुधारणा करण्यात आली आहे.

18 सप्टेंबर 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. 31 डिसेंबर रोजी बालकाला पूर्ण होणाऱया वयाचा विचार करून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून तीन प्लस आणि सहा प्लस या वयोमर्यादेची अंमलबजावणी करण्याचे आदेश उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

Related Stories

दापोली नगर पंचायतीचा देशात व्दितीय क्रमांक

Patil_p

महसूल मंडळे, तलाठी सजांची प्रत्यक्ष अंमलबजावणी खोळंबली?

NIKHIL_N

एक घर एक रोप; वी फाॅर यू संस्थेची संकल्पना; घरपोच मोफत रोपे देणार

Anuja Kudatarkar

NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा मुक्काम दहा तासांचा

NIKHIL_N

कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला सशर्त परवानगी

Archana Banage
error: Content is protected !!