Tarun Bharat

शाळा बांधकामासाठी माजी विद्यार्थी एकवटले

कंग्राळी बुद्रुक मराठी शाळेच्या दुसऱया मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

‘माझी शाळा आणि मी’ या शाळेच्या घोषवाक्याची पूर्तता करण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथील मराठी प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी एकवटले आहेत. शासकीय, माजी विद्यार्थी व इतर शिक्षणप्रेमी दानशुरांची मदतीतून सुरू असलेल्या बांधकामाच्या दुसऱया मजल्याचा शुभारंभ बांधकाम कमिटीचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, शाळा सुधारणा अध्यक्ष मोहन भैरटकर, ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भद्दरभडे, उमेश पाटील, भारता पाटील, अर्चना पठाणे, राजकुमार पाटील, निरंजन जाधव आदी उपस्थित होते.

बांधकाम कमिटीचे सदस्य शंकर कोणेरी यांनी मराठी शाळेच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने शासकीय निधीतून झाले असल्याचे सांगून दुसऱया मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ होत असल्याचे सांगून,  माजी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्यांनी दीपप्रज्वलन केले. यल्लोजी पाटील, राजकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तर ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, दत्ता पाटील आदींच्या हस्ते दुसऱया मजल्याच्या बांधकामाचे पूजन करण्यात आले.

शाळा पूर्णत्वास आणण्याचे आवाहन

शाळा व बांधकाम कमिटीतर्फे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजकुमार पाटील, यल्लोजी पाटील आदींनी आपल्या मराठी शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आणून शाळेची सुसज्ज इमारत तयार करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी व इतर दानशूर शिक्षणप्रेमी देणगीदारांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करुन शाळा पूर्णत्वास आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला नितीन पवार, राजू मन्नोळकर, भरमा हुरुडे, शंकर पाटील, सुधीर भेकणे, सागर भेकणे, संदीप कोळीसह इतर शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

देणगीदार पुढीलप्रमाणे. हिंडाल्को फॅक्टरी 5 लाख रुपये, माजी ग्रा. पं. अध्यक्ष कै. रामा पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडून 25 हजार रुपये, उद्योजक किरण तरळे व ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भद्दरगडे यांच्याकडून 25 हजार रुपये देणगी मिळाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शंकर कोनेरी यांनी केले. सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.

Related Stories

सोमवारी कोरोनाचे बारा नवे रुग्ण

Patil_p

सौंदत्ती यात्रेत दोन ट्रॉलींचे ट्रक्टर आणण्यास बंदी

Patil_p

उचगाव साहित्य संमेलनातर्फे कवींना नावनोंदणीचे आवाहन

Amit Kulkarni

भरतेश हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Amit Kulkarni

बेळगावात घरफोडय़ांचे सत्र सुरूच

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी उद्यानात दीपोत्सव

Amit Kulkarni