Tarun Bharat

शाळा व्यवस्थापनाकडून पालकांकडे ‘टय़ुशन फि’ मागणीवरून गोंधळ

Advertisements

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा तालुक्यातील एका खासगी प्राथमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापनातर्फे  पालकांना ‘टयुशन फि’ मागणीचे आवाहन केल्यामुळे पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शाळा व्यवस्थापनातर्फे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याची टय़ुशन फि सुमारे रू. 750 महिन्याकाठी (एकूण रू. 2250) भरणा करावी असे आवाहन केले आहे. सदर रक्कम आयडीबीआय बॅक खात्यात किंवा शाळेच्या कार्यालयात भरावी  असे पत्रकात नमूद केले आहे. मात्र पालकांनी यावर आक्षेप घेतलेला असून जोपर्यत कोविड स्थिती सुधारून शाळेचे वर्ग पुर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत टय़ुशन फि भरणार नाही असा पवित्रा काल बुधवारी शाळेमसोर एकवटलेल्या संतत्प पालकांनी घेतलेला आहे. याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

शाळेतर्फे येत्या महिन्यात परीक्षा घेण्याचे ठरविले असून सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे पालकांना सुचविण्यात आले आहे. फि भरून घेण्याच्या  उद्देशानेच शाळेतर्फे परीक्षा घेण्याचे ठरविले असा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा डाव आहे. कोविड काळात परीक्षेची गरजच काय? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

सदर विषयावर पालक शिक्षक समितीने मौन बाळगलेले आहे. पालकांनी टयुशन फि भरण्यासाठी फक्त सद्यपरिस्थितीत नकार दिलेला आहे. कोरोना महामारीची परिस्थिती सुधारून जेव्हा पुर्ववत शाळा सुरू होईल तेव्हा टयुशन फि भरण्याचे पालकांनी निर्णय घेतला आहे. सद्यपरिस्थितीत एकही वर्ग सुरू झालेला नाही. केवळ ऑनलाईन शिक्षण माध्यमातून उजळणी सुरू झालेली आहे. त्यामुळे शिक्षकाऐवजी पालकांवरच ऑनलाईन शिक्षणाचा बोजा वाढलेला असल्याचे काही पालकांची प्रतिक्रीया आहेत. या प्रकारावर शिक्षण खात्याने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

Related Stories

ओलेन्सियो सिमोईस व वसंत नाईक यांचा काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

काणकोण – मडगाव हमरस्त्यावर अपघात वाढीस

Omkar B

काणकोणात आढळले 11 कोविड रुग्ण

Amit Kulkarni

सत्तरीत उष्णतेचे प्रमाण वाढले

Omkar B

निघाले अंटार्क्टिकावर पुन्हा तिरंगा फडकवण्या

Patil_p

आयएनएस गोमंतकमध्ये नौदल दिन साजरा

Patil_p
error: Content is protected !!