Tarun Bharat

शाळेच्या सचिवाची मुख्याध्यापकास जीवे मारण्याची धमकी देत मारहाण

कागल/प्रतिनिधी

शाळेतील शिक्षकांनी दोन पगार आम्हाला न देता परस्पर बँकेतून का काढले. याचा राग धरून बेलवळे खुर्द येथील शाळेच्या मुख्याध्यापकास शाळेच्या सचिवांनी ठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राजाराम पाटील (रा. बेलवळे बुद्रुक) यांनी तीन जणांविरोधात कागल पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शाळेचे सचिव दिनकर श्रीपती कोतेकर, अभिजित दिनकर कोतेकर, अमोल दिनकर कोतेकर (सर्व रा. बेलवळे खुर्द) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्याध्यापक पाटील हे बेलवळे खुर्द येथील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. दिनकर कोतेकर हे या शाळेचे सचिव आहेत. त्यांनी मुख्याध्यापक पाटील यांना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरी बोलावून घेतले. पाटील यांच्यासह शाळेचा शिपाई व सहाय्यक शिक्षक असे मिळून दिनकर कोतेकर यांच्या घरासमोर गेले असता दिनकर, अभिजित आणि अमोल कोतेकर यांनी शिक्षकांनी दोन दोन पगार आम्हाला न देता परस्पर बँकेतून काढले आहेत. याचा राग मनात धरून तिघांनी फिर्यादी संतोष पाटील यांना तीन तास थांबवून ठेवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर तुला जिवंत ठेवत नाही तुला ठार मारतो अशी धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी तीन जणांविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिघा जणांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

बळीराजाच्या दसऱ्याला ‘प्रोत्साहन’ची गोडी

Archana Banage

पालकमंत्र्यांकडून दूध उत्पादकांची दिशाभूल

Archana Banage

कोल्हापूर : कोथळीतील वीरजवान सतीश वायदंडे अनंतात विलीन

Archana Banage

चित्रपट महामंडळाच्या विभाजनाचा डाव

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कोविड ड्यूटीवरील शिक्षकांना कार्यमुक्त करावे

Archana Banage

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

Archana Banage