Tarun Bharat

शाळेतील प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी / जयसिंगपूर

जयसिंगपुर येथे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विनाअनुदानित शाळेतील प्रलंबित प्रश्नांच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या वीस वर्षापासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषतः गेल्या अधिवेशनामध्ये शिक्षकांना अनुदान देण्याचा विषय मंजूर होऊनही अद्याप शासनाने याबाबत ठोस आदेश न काढल्याबाबत शिक्षकांच्यामध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे आज राज्यामध्ये संघटनेच्यावतीने लोकप्रतिनिधींच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयासमोर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वखाली शिक्षकांनी बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या मारून आंदोलन केल. उपस्थित विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सोशल डिस्टन्स ठेवून सदरचे आंदोलन करण्यात आले.मात्र यावेळी राज्यमंत्री यड्रावकर उपलब्ध नसल्यामुळे त्याच्यावतीने राजेंद्र झेले व नगरसेवक संभाजी मोरे यांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारून मोबाईल वरून नामदार यड्रावकर यांच्याशी चर्चा केली. लवकरच शिक्षकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका देऊ असे वचन दिल्याने हे आंदोलन समाप्त करण्यात आले.यावेळी मच्छिंद्र जाधव, अविनाश पाटील, सचिन कांबळे, एम व्ही जाधव, उमेश पोळ, इमरान कोटीवाले, जयश्री पाटील, नीता कांबळे, सुप्रिया दाबाडे, संजय खाडे, धौंडिबा देसाई यांच्यासह आदि शिक्षक उपस्थित होते.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते व महाआघाडीचे प्रमुख शरद पवार यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी फोनवरून संपर्क साधून येणार्‍या काही दिवसांमध्ये आपला प्रश्‍न सोडवला जाईल, असे आश्‍वसन दिल्याची माहिती खंडेराव जगदाळे यांनी दिली.

Related Stories

राजकारणात कुणीही कुठेही जाऊ शकतो

datta jadhav

महात्मा गांधींबद्दलआक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण महाराजला अटक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : महापौर निलोफर आजरेकरांना मुदतवाढ

Archana Banage

लसीकरणातील वशिलेबाजीत पोलिसांचा हस्तक्षेप

Patil_p

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

Archana Banage

कराचीत होणार ऑनलाईन शिवजयंती

Patil_p
error: Content is protected !!