Tarun Bharat

शासकिय पाणी पुरवठा योजनेतील पाण्याची तपासणी करा

प्रतिनिधी / कोल्हापूर

शासकीय पाणीपुरवठा योजनांद्वारे नागरिकांना देण्यात येणारे पाणी स्वच्छ व शुद्ध पुरवले जात वेळोवेळी तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी येथे दिले. तसेच जिह्यात पुरेसे पाणी असले तराही ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या कमी पाण्याचा वापर असणाया योजनांचा जास्तीत जास्त वापर करुन जलसाक्षरता व स्वच्छतेमध्ये कोल्हापूर जिह्याला राज्यात आणि देशात आदर्शवत बनवूया, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमार्फत जलसाक्षरता संवाद' या विषयावर जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,यशदा’चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, `यशदा’च्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांच्यासह जलनायक, जलयोध्दा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मी आदी ऑनलाईनदाद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पुरेसे आणि स्वच्छ पाणी असेल तर स्वच्छता देखील आपोआप राखली जाते. जिह्यात मुबलक पाणी असले तरीदेखील प्रत्येकाने पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ होते. शेतकयांनी ठिबक, तुषार सिंचनासारख्या पाण्याचा कमी वापर होणाया योजना राबवून आदर्श निर्माण करावा. आय.आय.टी.मुंबई, निरी या संस्थांनी मांडलेल्या मॉडेल्सचा उपयोग प्रत्येक गावांनी करायला हवा. प्रत्येक गावात शोषखड्डा तयार करणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, जिह्यातील जलदुत, जलमित्र, पाणी व स्वच्छता मित्र या सर्वांच्या सहकार्यातून गाव निहाय आराखडा तयार करुन त्यादृष्टीने जलसाक्षरता घडवण्यासाठी प्रयत्न करुया. शासकीय पाणीपुरवठा योजनांद्वारे नागरिकांना देण्यात येणारे पाणी स्वच्छ व शुद्ध पुरवले जात असल्याचीही तपासणी वेळोवेळी होणे गरजेचे आहे.

संजयसिंह चव्हाण म्हणाले, जिह्यात जलसंपत्ती मोठÎा प्रमाणावर आहे, परंतु याचा वापर योग्य प्रकारे व्हायला हवा. जलनायक, जलयोद्धे, जलदुत यांच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी प्रयत्न करण्यावर भर द्यायला हवा. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून जलसाक्षरतेबाबत व्यापक जनजागृती होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

डॉ मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, जिह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर जलसाक्षरता व जल प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

Related Stories

वीज दरामध्ये मोठी वाढ; आता युनिटनुसार कसे असणार दर, जाणून घ्या

Abhijeet Khandekar

सादळे मादळे येथे भाविकांची ट्रॉली पलटली; बावीस जखमी

Archana Banage

कोल्हापूर : त्रिसदस्यीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर

Archana Banage

कोल्हापूर : म.फुले स्मृतीदिनी शिक्षक दिन साजरा करावा

Archana Banage

मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात बुधवारी`वर्षा’वर बैठक

Archana Banage

कोरोना गेला समजून लसीचा दुसरा डोस टाळू नका

Archana Banage