Tarun Bharat

शासकीय यंत्रणेचा वापर करून मुश्रीफांनी १५०० कोटीचा भ्रष्टाचार केला: किरीट सोमय्या

कोल्हापूर/प्रतिनिधी

शासकीय यंत्रणेचा वापर करून मंत्री मुश्रीफ यांनी पंधराशे कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढच्या आठवड्यामध्ये राज्यपालांना मुंबईमध्ये भेटणार असून मानवाधिकार आयोगाकडे ही तक्रार करणार आहे असे त्यांनी सांगितले. संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडिंग्लज कारखाना संदर्भात सोमय्यायांनी दुपारी सव्वा दोन वाजता मुरगूड येथे जाऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांचा हा दौरा सुरू झाला आहे. या दौर्‍यात त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी ले आहेत.

मुश्रीफांविरोधात सोमय्यांनी दाखल केली तक्रार… पहा व्हिडीओ

Related Stories

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती : मनमोहन सिंग

prashant_c

दिलासादायक : महाराष्ट्रात उच्चांकी डिस्चार्ज

Tousif Mujawar

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावर श्वेतपत्रिका काढा

Archana Banage

पुणे विभागातून 1 लाख 69 हजार प्रवासी परराज्यात रवाना

datta jadhav

मलकापूर शहरात कॉलेजच्या हुल्लडबाज तरुणांवर निर्भया पथकाकडून कारवाई

Archana Banage

‘राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर येऊन महाप्रसाद घेऊन जावं’

Archana Banage