Tarun Bharat

शासकीय योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहचवा

आमदार चंद्रकांत जाधव यांचे आवाहन, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर अनुदानाचे पत्र प्रदान

प्रतिनिधी / कोल्हापूर

समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच समाजातील प्रत्येक नागरीकाने या कामात पुढाकार घ्यावा, आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीतर्फे मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी आदेशाचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार जाधव म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱया कागदपत्रांची माहिती नसल्याने या लाभापासून ते वंचित राहतात. या योजनेत किती लाभार्थी आहेत, याची माहिती घेऊन, कोल्हापूर शहरातील एक ही लाभार्थी योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता समितीच्या सर्व पदाधिकाऱयांनी घ्यावी. यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे पत्र वितरण आमदार जाधव, समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, समिती सदस्य चंदा बेलेकर, दिपाली शिंदे, सुनिल देसाई, रफीक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत जयदिप पाटील यांनी केले. आभार नरेंद्र पायमल यांनी मानले.

दोन बैठकीत 240 प्रकरणांना मंजुरी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्यावतीने दोन बैठकीत 240 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्याना मंजुरी आदेशाचे वितरण करण्यात आले.

Related Stories

एफआरपीच्या तुकड्यांवर शेतकऱ्यांच्या बनावट सह्या – राजू शेट्टी

Archana Banage

तरुण भारतच्या आवाहनाला प्रतिसाद; ‘त्या’ ऊसतोड कामगारांना मिळाली मदत

Archana Banage

मुदाळच्या कृषिकन्यांनी बनवले भाजीपाला टिकवणारे शितगृह

Archana Banage

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : सीपीआरच्या अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती

Archana Banage

इचलकरंजी येथे दीड लाखांचा गुटखा जप्त

Archana Banage