Tarun Bharat

शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्तपिशव्या

सर्वसामान्य रूग्णांना दिलासा : सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय खर्चात बचत

नंदकुमार तेली / कोल्हापूर

कोरोनाच्या संकट काळानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे काही निर्णय घेत आहे. आरोग्य विभागाशी संबंधित असा अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय रूग्णालयात विविध आजाराने ग्रस्त झाल्याने उपचारार्थ दाखल झालेल्या रूग्णांना यापुढे मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने एका आदेशाव्दारे दिले आहेत. त्यामुळे शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना आवश्यकता भासल्यास मोफत रक्तपिशवी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

३४ रक्तपेढयांमध्ये मिळणार मोफत रक्तपिशव्या
सार्वजनिक विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न शासकीय रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांवर मोफत रक्तपिशव्या उपलब्ध होणार आहेत. सध्या राज्यातील सार्वजनिक विभागांत एकुण ३४ रक्तपेढया कार्यरत आहेत. या रक्तपेढीत संकलित झालेल्या रक्तपिशव्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत होणार खर्च हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडयामध्ये (पीआयपी) या बाबींसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून होणार आहे.

प्रतिवर्षी सुमारे १.५ लक्ष रक्तपिशव्यांचे संकलन
सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत असलेल्या राज्यातील ३४ रक्तपेढयांमार्फत प्रतिवर्षी सुमारे १.५ लक्ष रक्तपिशव्या संकलित होतात. या संकलित झालेल्या रक्तपिशव्यांची गरजू रूग्णांना पुरवठा करण्यात येतो. शासनातर्फे २७ एप्रिल २०१५ च्या आदेशानुसार रक्तपिशव्यांसाठी सेवा शुल्क दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा व सुविधांतर्गत मोफत रक्तपिशव्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर विचार सुरू होता. त्यानुसार मोफत रक्तपिशव्या उपलब्धतेसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वसामान्य, गरीबवगरजूरुग्णांनादिलासा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटली होती. यामुळे रक्तसंकलन घटले आणि रक्तपिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच या काळात सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. वैद्यकीय खर्च हाताबाहेर गेला होता. रक्तपिशव्यांची उपलब्धता आर्थिक व मानसिकदृष्टया त्रासदायक ठरली होती. यावर उपायोजनेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लॉकडाऊन लागूच्या सुरूवातीपासून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. मोफत रक्तपिशव्या मिळण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मोफत रक्तपुरवठा निर्णय स्वागतार्ह
यामुळे सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना रक्तपिशव्यांची मोफत उपलब्धता होणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय रक्तपेढीतून मोफत रक्त पिशव्यांचा पुरवठयासंदर्भात घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. रक्तसंकलनात वाढ होऊन कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यास मदत होणार आहे.
– अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे (राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

Related Stories

लाचेची बोली हजारापासून लाखांपर्यंत

Abhijeet Khandekar

पिंपळगाव खुर्दमध्ये मुश्रीफ गटाची सत्ता; सरपंचपदी शीतल नवाळे विराजमान

Archana Banage

प्राथमिक शाळांना बालवाडी संलग्निकरण करावे

Archana Banage

पेठ वडगावमध्ये ५ ते ८ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन

Archana Banage

टरबूज आज कसब्यात फुटलं, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Archana Banage

फडणवीसांच्या त्यागाचा भाजपला अभिमान

Abhijeet Khandekar