Tarun Bharat

शासकीय सेवेत समयोजनासाठी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु

तात्पुरत्या सेवेतील 550 डॉक्टरांचा समावेश

सोलापूर : प्रतिनिधी

शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कोविडचे उपचार करत असताना आरोग्य सुरक्षा कवच द्यावे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आजपासुन बेमुदत संप पुकारला आहे. परिणामी सिव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांची उपचाराविना हेळसांड सुरु झाली आहे.

     सोलापुरातील तात्पुरत्या सेवेतील डॉ. कुंदन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 35 डॉक्टरांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर राज्यातील जवळपास 550 डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोलापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तात्पुरत्या सेवेतील डॉक्टरांनी सोमवारी सकाळी 11 वाजता “समान काम समान वेतन, खुप झाला अत्याचार समावेशन आमचा अधिकार, सातवा वेतन आयोग लागू करा, कोविड योध्यांचा सन्मान करा” आदी फलक घेऊन आंदोलनास सुरुवात केली. तसेच विविध मागण्यां संदर्भात जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका यावेळी डॉक्टरांनी घेतली.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये २५८ जण कोरोनामुक्त

Archana Banage

सोलापूर : वैरागमध्ये रेशनच्या धान्यात काळाबाजार, सुमारे दोन लाखाचे धान्य जप्त

Archana Banage

पैशाच्या कारणावरून सावकाराने एकास भोसकले

Archana Banage

उत्तम कलेला मरण नाही : राज ठाकरे

prashant_c

सोलापूर शहरात २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, ४ जणांचा मृत्यू

Archana Banage

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

Archana Banage