Tarun Bharat

शासनाचा विरोध मोडून वारी करणार-भिडे गुरूजी

वारीला बंदी घालून शासनाने घोर अपराध केला, पालखी मुक्कामाच्या गावात मुक्कामकरा- गुरूजींनी दिले आदेश

वार्ताहर/ कराड

पंढरपूरच्या वारीला बंदी म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासाला बंदी. ही बंदी घालून शासनाने दुष्यासनापेक्षाही घोर अपराध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बंडातात्या कराडकर यांची भेट घेऊन बंदी उठवावी. तसेच ज्या ज्या गावात पालखी मुक्काम करते, त्या गावात परिसरातील सर्व गावांतील नागरिकांनी शासनाचा विरोध मोडून मुक्काम करावा व वारीची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी  यांनी केले.

 कोरोनाच्या संकटामुळे शासनाने आषाढी पंढरपूर पायी वारीला बंदी घातली आहे. वारीचा आग्रह धरणारे हभप बंडातात्या कराडकर यांना करवडी येथे स्थानबद्ध केले आहे. शासनाच्या या कृत्याचा निषेध करत शिवप्रतिष्ठानच्यावतीने भिडे गुरूजींच्या नेतृत्वाखाली सोमवारी दत्त चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. दुर्गप्रेमी के. एन. देसाई, केदार डोईफोडे, सागर आमले, प्रवीण माने व धारकरी उपस्थित होते.

  भिडे गुरूजी म्हणाले की, शासन चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची बुद्धी डागाळली आहे. त्यामुळेच त्यांनी पंढरपूरच्या वारीला बंदी घालत माणसाच्या रूपात देवत्व असणाऱया बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केले आहे. बंडातात्या कराडकर यांना मुक्त करून शासनाने आपली चूक सुधारावी. वारी ही हिंदुस्थानची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला खोडा घालण्याचे दुष्कृत्य महाराष्ट्र शासनाने केले आहे. संतांची परंपरा मोडीत काढण्याचा हा डाव उधळून लावला पाहिजे.

        भिडे गुरूजींनी घेतली बंडातात्यांची भेट

 प्रशासनाने हभप बंडातात्या कराडकर यांना करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्र येथे स्थानबद्ध केले आहे. तहसील कार्यालयावरील मोर्चा व निवेदन दिल्यानंतर भिडे गुरूजी यांनी करवडी येथे जात बंडातात्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी धारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

    भिडे गुरूजींसह धारकरीही विनामास्क

 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांवर पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करत 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. मात्र सोमवारी शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चात भिडे गुरूजी यांच्यासह धारकरीही विनामास्क होते.

Related Stories

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

राज्यात उद्यापासून पावसाचे जोरदार आगमन

Archana Banage

सीईओंच्या रडारवर माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, समाजकल्याण

datta jadhav

सातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगरमध्ये कोरोनाने महिलेचा मृत्यू

Archana Banage