Tarun Bharat

शासन आदेशानुसार शैक्षणिक फीमध्ये 15 टक्के सवलत द्या

विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी : शाळा व्यवस्थापनाला निवेदन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शासन आदेशानुसार 2021- 22 च्या शैक्षणिक वर्षातील फी मध्ये 15 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दि. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गोयंका स्कूलच्या प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की : 2022च्या सुरुवातीला शाळा दोन महिने ऑफलाइन बंद होती. तरीही शासनाच्या आदेशानुसार आम्ही सर्व पालक 85 टक्के फी भरण्यास तयार आहोत. शाळेने फी मध्ये 15 टक्के सवलत द्यावी, अशीवनंती या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर शाळेतील पालक कमिटीच्या राधिका ठोंबरे, रश्मी सूर्यवंशी, आश्विनी काटकर, स्वाती कोठावळे, अबोली जाधव, वैभवी सूर्यवंशी, आर्या महाजन, वैशाली कुलकर्णी, यांच्यासह रोहन टोणपे, अमोल काटकर, उमेश जाधव या पालकांच्याही स्वाक्षऱया आहेत.

Related Stories

कोल्हापूर : जास्तीत जास्त कोरोना लसीसाठी राज्याकडे पाठपुरावा

Archana Banage

कोल्हापूर : कोगे, महे व पाडळी खुर्द ग्रामपंचायत प्रचार अंतिम टप्प्यात ; दुरंगी आघाड्यांचा पदयात्रेवर भर

Archana Banage

गरुड मंडपात विराजमान होणार अंबाबाईची 51 किलो चांदीची मूर्ती

Abhijeet Khandekar

युक्रेनमधील नागरिकांसाठी केंद्राशी समन्वय साधण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : संसर्गित डॉक्टरांसाठी ‘स्पेशल’, कर्मचाऱयांसाठी ‘जनरल’ वॉर्ड

Archana Banage

कोल्हापूर (पन्हाळा) : मंगळवारपेठ ग्रामस्थांच्या डोक्यावर दरडीचे संकट

Archana Banage