Tarun Bharat

शास्त्रीनगर नाल्यावरील अतिक्रमण थांबवा

सहावा क्रॉस परिसरातील रहिवाशांची मनपाकडे तक्रार

प्रतिनिधी/ बेळगाव

शास्त्रीनगर सहावा क्रॉस येथे नाल्यामध्ये अतिक्रमण करून भिंत बांधण्यात येत असल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पाहणी करून बांधकाम थांबविण्याची सूचना मनपाच्या अधिकाऱयांनी संबंधितांना केली होती. तरीदेखील मनपाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

 शास्त्रीनगर नाल्यामध्ये अतिक्रमण होत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत आहे. पण महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. यापूर्वीदेखील अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणावेळी नाल्याची रुंदी अतिक्रमाणांमुळे कमी झाल्याचे आढळून आले होते. मात्र, अतिक्रमणाबाबत महापालिकेने कोणतीच ठोस कारवाई केली नाही. काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम महापालिकेने केले आहे. मात्र, बांधकाम नसलेल्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे पावसाळय़ात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन शास्त्रीनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते.

सहावा क्रॉस येथे झालेल्या अतिक्रमणाबाबत यापूर्वीदेखील तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. नाल्यात असलेली संरक्षक भिंत पावसात कोसळल्याने पुन्हा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पण सदर बांधकाम नाल्यात अतिक्रमण करून करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार शास्त्रीनगर सहावा क्रॉस परिसरातील रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांनी नाल्याची पाहणी करून बांधकाम थांबविण्याची सूचना संबंधितांना केली आहे. मात्र, अधिकाऱयांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून नाल्यामधील बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. अतिक्रमण झाल्यास नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे नाल्याची पाहणी करून होणारे अतिक्रमण थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Related Stories

आंबेवाडी भगतसिंग हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Amit Kulkarni

राजर्षी शाहू महाराज जयंती निलजी येथे साजरी

Amit Kulkarni

उक्कड येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

रिंगरोड विरोधात हरकत नोंदीसाठी शेतकऱयांचा पुढाकार गरजेचा

Amit Kulkarni

महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नी ठरावाचे मुख्यमंत्र्यांकडून जोरदार खंडन

Amit Kulkarni

‘आयुष’तर्फे शुक्रवारी विनामुल्य उपचार

Patil_p