Tarun Bharat

शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीतील शाहिन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकाना तेथून हटविण्यात यावे, या संदर्भात सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सविस्तर सुनावणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात अमित साहनी यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली. न्या. संजय कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली.

दरम्यान, कोर्टाने येत्या सोमवारी म्हणजेच फेब्रुवारीला सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. दिल्लीमध्ये उद्या, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे. हा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडला. यावर कोर्टाने म्हटले की, त्यामुळेच आम्ही सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तिथे काहीतरी गडबड निश्चित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

 

 

Related Stories

पंजाबमध्ये मागील 24 तासात 582 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

बिहार विधानसभा अध्यक्षपदी अवध बिहारी चौधरी

Patil_p

देशात 1.69 लाख बाधित रुग्ण

datta jadhav

‘डिझाईन बॉक्स’वर प्राप्तिकरचा छापा

Patil_p

प.बंगालमधील हिंसाचारासंबंधी सीबीआयकडून पहिला गुन्हा दाखल

Patil_p

कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मत्यू 800 पार

Patil_p