Tarun Bharat

शाहीस्नानासाठी रेल्वेही सज्ज

हरिद्वार येथे सध्या कुंभमेळय़ाची पर्वणी सुरू असून दररोज लक्षावधी भाविक गंगास्नानाचा अनुभव घेत आहेत. या कुंभमेळय़ातील प्रमुख शाहीस्नान 12 आणि 14 एप्रिलला आहे. ही पर्वणी साधून पुण्यप्राप्ती करून घेण्यासाठी लक्षावधी भाविकांनी नोंदणी केली असून त्यांच्या प्रवासासाठी रेल्वे विभाग सज्ज होत आहे.

हे शाहीस्नान गंगेच्या काठावर अनेक ठिकाणी एकाच मुहूर्तावर होते. त्यामुळे कोणत्या घाटावर कोणते भाविक जाणार हे समजणे सोपे व्हावे म्हणून रेल्वेने प्रतीक्षालयांना वेगवेगळे रंग देण्याची योजना आखली आहे. ज्या रंगाच्या प्रतीक्षालयात प्रवासी थांबेल तो पूर्वनिर्धारित विशिष्ट घाटावरच गंगास्नानासाठी जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता एकाच ठिकाणी प्रवाशांनी गर्दी करू नये. तसेच शक्मय तितक्मया प्रमाणात सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन व्हावे, यासाठी रेल्वे शक्मय तितके सर्व प्रयत्न करेल, असे रेल्वेच्या उत्तर विभागाच्या प्रमुख कार्यालयातून सांगण्यात आले. शाहीस्नानासाठी देशाच्या विविध भागातून भाविक रेल्वेद्वारे हरिद्वार स्थानकावर येतात आणि त्याच रेल्वेतून परत जातात. कोणता भाविक कोणत्या राज्यातून आला आहे, हे समजण्यासाठी प्रतीक्षालयांची चार रंगात विभागणी केली आहे. तांबडा, भगवा, हिरवा आणि निळा असे रंग आहेत. प्रवाशांना यासंबंधीची कल्पना आधी देण्यात आली असून राज्ये आणि शाहीस्नानाचे ठिकाण अशी विभागणीक रण्यात आली आहे. या विभागणीची कल्पना त्या त्या रंगावरून प्रत्येक प्रवाशाला येणार आहे. प्रवासी वाट चुकू नयेत. तसेच चुकीच्या रेल्वेत बसू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इतिहासात प्रथमच अशा तऱहेची उपाययोजना केली गेली आहे.

Related Stories

भाजप कार्यकर्त्यासह दोघांची दहशतवाद्यांकडून हत्या

Patil_p

उपचाराधीन कोरोना रुग्णांमध्ये आणखी घट

Patil_p

जनतेचा आवाज चिरडला जातोय!

Patil_p

देशात लसीकरणाचा आकडा 50 कोटींवर

Patil_p

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार

datta jadhav

‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश

Amit Kulkarni