Tarun Bharat

शाहूनगरी कडेकोट बंदोबस्तात….!

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार शाहूनगरीत शनिवारी कडेकोट लॉकडाऊन होते. शहरातील सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली होती. कोणालाही ना बाहेरून शहरात येता येत होते, ना शहरातल्यांना बाहेर जाता येत नव्हते. मोळाचा ओढा, वाढे फाटा, शिवराज पेट्रोल पंप तिकटणे, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अंजठा चौक, बोगदा असे शहरात येणारे रस्ते पोलिसांनी सकाळी 11 वाजता बंद केले होते. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. जे दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई पोलिसांनी केली.

  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिह्यात होत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक नियमावली काढली आहे. त्यानुसार सातारा पोलिसांनी शनिवारी सकाळी सातारा शहरातील व्यापाऱयांनी, भाजी विक्री करणायांना आणि औषध विक्रेते यांना सूचना दिल्या. त्यानुसार शहरात केवळ 11 वाजे पर्यंत दुकाने सुरू होती. त्यानंतर शहरातील येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होती. पोलिसांनी वाई व मेढय़ाकडून येणारा रस्ता मोळाचा ओढा येथे तर बॅरिकेट लावून बंद केला होता. शाहूपुरी पोलीस बंदोबस्त करत होते. तर परळी भागातील जाण्यासाठी असणाऱया बोगदा परिसरात शाहूपुरी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सातारा- कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली सातारा शहर पोलिसानी तपासणी सुरू केली होती. सातारा- रहिमतपूर रस्त्यावर अंजठा चौकात आणि कराड बाजूकडे जाणाऱया रस्त्यावर शिवराज पेट्रोल पंपाच्या ठिकाणी नाकाबंदी सुरू होती. तसेच वाढे फाटय़ावरही फौजफाटा तैनात होता. वाहतूक शाखेने शहरातील ठिकाठिकाणी तपासणी केली. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते आज निर्मनुष्य दिसत होते. जे काही हातच्या बोटावर मोजणारे नागरिक महत्वाचे काम म्हणून बाहेर पडत होते. काहीजण विनाकारण पडत होते त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल वायकर आणि वाहतूक शाखेचे विठ्ठल शेलार हे स्वतः नाकाबंदीला होते.

Related Stories

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले राजेश टोपे?

datta jadhav

सातारा : जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 3 बाधितांचा मृत्यू

Archana Banage

Anil Deshmukh Case : वैफल्यातून चौकशीचा ससेमिरा लावला जातोय – संजय राऊत

Archana Banage

कोल्हापूर : अलायन्स एअरची हैदराबाद-कोल्हापूर विमानसेवा अखंडित सुरू

Archana Banage

साताऱयातील हॉटेल व्यवसाय सुरु करा

Patil_p

मनसेचा आज पाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

Abhijeet Khandekar