Tarun Bharat

शाहूनगर येथील शाळेच्या बांधकामाला स्थानिकांचा विरोध

काम थांबविण्याची मागणी : जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन सादर

प्रतिनिधी /बेळगाव

विनायक कॉलनी, शाहूनगर येथे 8 गुंठे जमिनीवर कट्टीमनी कन्नड मिडियम स्कूलचे बांधकाम सुरू आहे. या जागेला लागूनच मारुती देवस्थान असून, दररोज भाविक या मंदिराला येतात. सदर शाळेला मैदान नसल्याचे कारण देत 30 वर्षांच्या कराराने जागा बुडाकडून घेण्यात आली. परंतु, सद्यस्थितीत या ठिकाणी शाळेकडून बांधकाम केले जात असून याला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. या शाळेला इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शाहूनगर येथील नगरसेवक व नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली.

विनायक कॉलनी, शाहूनगर येथील जागा बुडाकडून कराराने घेण्यात आली आहे. परंतु यामुळे याचा फटका स्थानिकांना बसत आहे. शाळेला मैदान नसल्याचे कारण देत ही जागा घेण्यात आली असली तरी सध्या तेथे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाकडे याविषयी माहिती विचारली असता महानगरपालिका व बुडाची परवानगी असल्याचे सांगण्यात आले. परंतु महानगरपालिकेने अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले.

शाळेसाठी इतरत्र जागा द्या

शाळेला विरोध नसून बांधकामाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या शाळेसाठी इतरत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.महसूल अधिकारी एस. एम. परगी यांनी जिल्हाधिकाऱयांच्या वतीने निवेदन स्वीकारले. यावेळी नगरसेविका रेश्मा पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, ऍड. खडकभावी, सतीश चित्रगार, राजू बिसनकोप्प यासह शाहूनगर येथील रहिवासी उपस्थित होते.

Related Stories

मनपातील बैठकीत कोणती ‘डील’?

Omkar B

रांगोळीतून साकारली पंढरीची वारी

Patil_p

कोचरीत 6 दिवसांनंतर मगरीला पकडण्यात यश

Amit Kulkarni

इंडियन बॉईज, सीसीआय संघ विजयी

Amit Kulkarni

सांडपाण्यामुळे अळवण गल्लीतील गटारी तुंबल्या

Amit Kulkarni

कपिलेश्वर तलावात सांडपाणी मिसळल्याने पाणी झाले दूषित

Rohit Salunke