Tarun Bharat

शाहूपुरीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही

आमदार शिवेंद्रराजे भोसले ः विविध विकासकामांचा शुभारंभ

प्रतिनिधी/ सातारा  

शाहुपुरीतील अनेक समस्या आपण सोडवल्या आहेत. येथील नवीन पाणी योजना पूर्णत्वाकडे जात असून पेढय़ाच्या भैरोबाला यात्रा स्थळाचा दर्जा मिळवणे, शाहुपुरीमध्ये अद्यावत मंडई उभारणे यासह आरोग्य, पाणी आदी मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल. शाहुपुरी भागातील जनतेने नेहमीच मोलाची साथ दिली असून शाहुपुरीच्या विकासात आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

शाहुपुरी ग्रामविकास आघाडीच्या पाठपुराव्यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी शाहुपुरी व परिसरात 5 कोटी 30 लक्ष रुपयांची विकासकामे मंजूर केली होती. या विविध कामांचा शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, भारत भोसले, राजेंद्र मोहिते, दादा बदडरे, संजय शेलार, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलमताई देशमुख, माधवी शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहूपुरी येथील अभिनव कॉलनी परिसर, तामजाईनगर रस्ता डांबरीकरण, गंगासागर कॉलनी अंगणवाडी इमारत उद्घाटन, जयविजय कॉलनी रस्ता डांबरीकरण,  सोमेश्वर कॉलनी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, शिवपार्वतीनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, म्हसवे-शाहूपुरी-सारखळ रस्ता डांबरीकरण या  कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तसेच सैदापूर, सारखळ व कळंबे गावच्या नूतन ग्रामपंचायत सदस्य, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संजय बारंगळे, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कांबळे, स्कॉलरशिप परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 10 वा आलेला राज जाधव व स्कॉलरशिप परिक्षेत राज्य गुणवत्ता यादीत 14 वी आलेली  अनुशूता सोरटे यांचा सत्कार करण्यात आला. 

शोभा केंडे यांनी स्वागत व सुत्रसंचलन केले. मासचे उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आभार मानले. याप्रसंगी नितीन तरडे, राजेंद्र केंडे, विश्वतेज बालगुडे, अजय भोसले, संकेत परामणे, सुरेश चिंचकर, महेश जांभळे, आप्पा गोसावी, गणेश वाघमारे, महेंद्र गायकवाड, सुरेश शेटे, निखिल प्रभाळे, सादिक आतार, समीर खरात, बांधकाम विभागाचे राहुल अहिरे, अतुल जोशी तसेच नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. 

रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी

गंगासागर कॉलनीत अंगणवाडी इमारत उद्घाटनंतर मोळाचा ओढा येथून कॉलनीत येणारा रस्ता खराब झाला असून हा रस्ता सध्या बंद करण्यात आल्याचे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी या  रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता खुला करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना केल्या. त्यामुळे याही रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला.

Related Stories

पुणे, नागपूर मेट्रोची परवानगी मी दिल्लीतून आणली

Patil_p

मराठा आरक्षणाला माओवाद्यांचा पाठिंबा म्हणजे महाविकास आघाडीला धोक्याची घंटा

Archana Banage

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीला अटक, पुणे पोलिसांची कार्यवाही

Archana Banage

सातारा पालिका आता तरी विलिनीकरण कक्ष उभारणार का?

Patil_p

नऊ वर्षाची ज्ञानेश्वरी चालवतेय टेम्पो

datta jadhav

कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपाल म्हणून कोश्यारींची जागा घेणार ?

Abhijeet Khandekar