Tarun Bharat

शाहूपुरीत टोळक्याकडून मारहाणीत युवक जखमी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शाहूपुरीतील पेट्रोल पंपावर जुन्या भांडणाच्या कारणातून एका युवकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी यश जांभळे याच्यासह आठजणांच्या टोळक्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 17 रोजी सायंकाळी ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवक मंगेश राजेश भोसले (वय 17, रा. महालक्ष्मी मंदिर, गडकरआळी, सातारा) व त्याचा मित्र श्रीकांत दुचाकीवरुन कोंडवे गावाकडे निघाले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणातून यश जांभळे (रा. गेंडामाळ नाका, आर्यांग्ल कॉलेजसमोर, सातारा) याने मंगेशला दुचाकी आडवी मारुन थांबवले. यावेळी जांभळेने त्याच्या इतर 7 ते 8 मित्रांनाही बोलावून घेतले.

यश जांभळे व त्याच्या मित्रांनी मंगेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगड फेकून मारल्याने त्याच्या कानाला जखम होवून तो जखमी झाला असून यावेळी टोळक्याने त्याचा मोबाईल फोडून मोबाईलचे नुकसान केले आहे. याप्रकरणी यश जांभळेसह सात ते आठ अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार दबडे या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह

Archana Banage

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

datta jadhav

‘त्या’ युवकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये

datta jadhav

कराडमध्ये पावसाने प्रचंड नुकसान

datta jadhav

जिल्हय़ात लम्पीचा पहिला बळी

Patil_p

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीची कारवाई; 13.41 कोटींची मालमत्ता जप्त

datta jadhav
error: Content is protected !!