Tarun Bharat

शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरटा अटक, सव्वा लाखाच्या ५ दुचाकी जप्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

शहर आणि परिसरामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे दुचाकी चोरटयाचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी मंगळवार दि. २ जून रोजी विचारे माळ परिसरात सापळा रचून संशयीत अजय बाळासो पटकारे (वय-३६, रा.विचारेमाळ, सिमा अपार्टमेंट समोर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

शहरात चोरीचे प्रमाण वाढले होते. शाहूपुरी पोलिसांसमोर चोरटयाचा शोध घेण्याचे आव्हान होते. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे शाहूपूरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरवात केली.

दरम्यान पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना विचारेमाळ येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजय पटकारे हा पुन्हा कार्यरत झाला असून त्याने काही दुचाकी चोरी केल्याची गोपनिय माहीती मिळाली. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना सापळा लावण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे २ जून रोजी संशयित आरोपी अजय पटकारे राहत असलेल्या सदरबाजार परिसरामध्ये सापळा लावला.

संशयित अजय बाळासो पटकारे (वय-३६, रा.विचारेमाळ,सिमा अपार्टमेंट समोर) हा हिरोहोंडा दुचाकीवरुन फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेवून सविस्तर चौकशी केली असता त्याने ही दुचाकी दोन दिवसांपुर्वी चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीमध्ये त्याने अश्विनी हॉस्पीटल,एसटी स्टॅन्ड,लक्ष्मीपूरी भाजी मंडई,निंबाळकर चौक येथून आणखी ४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून लाख रुपये किंमतीच्या ५ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित अजय बाळासो पटकारे याला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रेरणा कट्टे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ.अशोक पाटील, वसंत पिंगळे, पो.ना. युवराज पाटील, प्रशांत घोलप, किरण वावरे, प्रथमेश पाटील, दिग्वीजय चौगुले, दिगंबर पाटील, विशाल चौगुले, विजय इंगळे, नारायण कोरवी, विकास चौगुले, अनिल पाटील यांनी केली.

Related Stories

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; मुद्देमाल ताब्यात

Abhijeet Khandekar

राज्यात कोरोनाबाधित दोन हजार रुग्ण बरे होऊन घरी

Archana Banage

स्वच्छ सर्व्हेक्षणात राज्यात गडहिंग्लजचा सहावा क्रमांक

Archana Banage

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्रीपदासाठीच आघाडी

Archana Banage

महाराष्ट्रात 12,614 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

‘अलमट्टी’बाबत ‘पाटबंधारे’ने समन्वय ठेवावा : पालक सचिव प्रवीण दराडे

Abhijeet Khandekar