Tarun Bharat

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

शहर व परिसरातून दुचाकीवरून ४ मोबाईलची चोरी

प्रतिनिधी / कोल्हापुर

शहरातील रुईकर कॉलनी, वाशी नाका, तपोवन मैदान परिसरात दुचाकीवरून मोबाईल चोरून पलायन करणाऱ्या दोघा चोरटयांच्या मुसक्या शाहूपुरी पोलिसांनी आवळल्या. सतिश राजेश बाटुंगे (वय- २२, रा. कंजारभाट वसाहत, मोती नगर,एसएससी बोर्ड जवळ), राज अंजूम मुल्ला (वय- २१ रा. गणेश अपार्टमेंन्ट, राजेंद्रनगर. सद्या दोघेही राहणार कदमवाडी) या दोघांना पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे ४ मोबाईल हॅण्डसेट व २ दुचाकी हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे देशभरात लॉकडाऊन केले होते. दोन महिन्यानंतर यामध्ये शिथिलता आली.त्यामुळे शहर व परिसरामध्ये काही अंशी व्यवहार सुरू झाले. सायंकाळी ५ नंतर शहरातील सर्व व्यवहार बंद होत असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असते. याचाच फायदा घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुन्हा आपल्या कारवाया सुरु केल्या. याविषयी गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना अशा गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे कर्मचारी सक्रिय झाले.

दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकीवरील मोबाईल स्नॅचिंग करण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, हवालदार अशोक पाटील, वसंत पिंगळे, पोलीस नाईक प्रशांत घोलप, किरण वावरे, युवराज पाटील, अनिल पाटील, प्रथमेश पाटील, कॉन्स्टेबल विशाल चौगुले, दिग्विजय चौगुले, दिगंबर पाटील, विजय इंगळे, नारायण कोरवी, विकास चौगुले यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

गुन्हेगार शोध मोहीमेमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कारागृहातुन जमिनीवर सोडलेले राजू मुल्ला व सतीश बाटूंगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्यांनी शहर आणि परिसरामध्ये रस्त्यावरून मोबाईलवर बोलत निघालेल्या लोकांचे मोबाईल दुचाकीवरून हिसकावल्याची कबूली दिली. त्यांनी गुन्हयात वापरलेली दुचाकी तसेच चोरीची दुचाकी व ४ मोबाईल हँण्डसेट असा सुमारे दीड लाख किंमतीचे साहित्य हस्तगत केले.

चोरटयांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी
अटक केलेल्या चोरट्यां पैकी राजू मुल्लाचे अकरावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो सेंट्रींग काम करीत होता. तसेच यापूर्वी देखील त्याने अशा पद्धतीने अनेक गुन्हे केले आहेत. दुसरा गुन्हेगार हा मोतीनगर मध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे चौथीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो इतर वेळी चालक म्हणून काम करत होता.प्रवासी भाडे तो घेऊन राज्य- परराज्यात जात होता. मात्र चोरीच्या सवयीमुळे या दोघांचीही हातची कामे गेली आणी जेलवारी नाशिबी आली.

Related Stories

अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

datta jadhav

महाबळेश्वर तालुक्यात एक महिला पॉझिटिव्ह

Archana Banage

सातारा पालिकेत ही सॅनिटायझर शॉवर मशीन बसवले

Patil_p

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स

Archana Banage

आरळे येथे चार लाखाचे तांब्याचे स्क्रॅप चोरीला

Abhijeet Khandekar

ग्रा.पं.निवडणुकीचे ऑक्टोबरअखेरीस बिगुल

Archana Banage