Tarun Bharat

शाहूपुरी पोलिसांची 34 दुचाकी चालकांवर कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवर एका व्यक्तीलाच बसण्याची परवानगी असताना जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन डबलसीट प्रवास करणाऱया 34 दुचाकी चालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली.

मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुमारास जुना आरटीओ चौकात दुचाकीवर डबलसीट प्रवास करणाऱया महेश शिंदे (रा. कूपर कॉलनी, सातारा), परशुराम दिनकर शेलार (रा. म्हसवे, ता. सातारा), श्रीकांत संजय माने (रा. संगमनगर, सातारा), उमेश प्रकाश साळुंखे (रा. जयविजय हौसिंग सोसायटी, सातारा) सुरेश बळीराम जमदाडे, शुभम हणमंत निंबाळकर हे दुचाकीवर डबलसीट प्रवास करत असताना आढळून आल्याने त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली.

राधिका सिग्नल चौकानजिक निलेश शिवाजी शेलार, योगेश रवींद्र क्षीरसागर, सुरज विजय विभुते, अमोल पुंडलिक भिसे, अरविंद अर्जुन फाळके, विनय विष्णू सावंत, सुनील निवृत्ती सकटे, अमोल श्रीरंग धनवडे, अमोल नारायण घोरपडे यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाढे फाटा येथे अनिल इनामदार, अक्षय महेंद्र पवार, अक्षय फळके, अमित कांबळे, विलास चव्हाण, राहुल सकुंडे, सुनील बर्गे, समीर शिंदे, अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मोती चौक परिसरामध्ये संकेत शशिकांत धनवडे, सुरज विलास कुंभार, सागर प्रदीप साळुंखे यांची वाहने जप्त करण्यात आली. मोळाचा ओढा येथे श्रीकृष्ण जनार्दन पवार, अनिकेत आनंदा गलांडे, प्रथमेश संजय चिंचकर, शुभम शशिकांत फडतरे यांच्या वाहनावर कारवाई करण्यात आली. याबाबत हवालदार राजू जाधव यांनी तक्रार दिली असून हवालदार कुंभार पुढील तपास करत आहेत.

Related Stories

कोरोनाच्या काळात सोनगाव कचरा डेपोत जैविक कचरा कसा ?

Archana Banage

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Tousif Mujawar

किसनराव मोरे शैक्षणिक संकुलाचे कोरोना लढाईत महत्त्वाचे योगदान

Archana Banage

सातारा : धावपटू अलमास मुलाणी यांचे कार्य प्रेरणादायक

datta jadhav

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 10 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar