Tarun Bharat

शाहूवाडीतील तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दोघे जखमी

प्रतिनिधी / शाहुवाडी

आंबा तालुका शाहूवाडी पैकी तळवडे येथील शांतय्या शंकरय्या स्वामी वय ६० यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून घरातील माणसांच्या वर कोयता व तलवारीने वार करून दरोडा घालत दोन लाख रुपये रोख सहा तोळे सोने गाडी असा मुद्देमाल लंपास केला आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. मंगळवारी ही घटना घडली. शाहूवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन भेट तपास यंत्रणा गतिमान केली आहे. आंबा पैकी तळवडे येथील शांतय्या शंकरय्या स्वामी त्यांच्या घरात अज्ञात सात ते आठ जणांनी प्रवेश करून घरातील नागरिकांना बांधून ठेवत दोन लाख रुपये सहा तोळे सोने बोलोरो गाडी असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच दोघांवर कोयता व तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

Related Stories

कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

नेपाळकडून सीमाभागात रस्ते बांधणीच्या कामाला वेग

datta jadhav

पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का?; सोमय्या तक्रार करण्यासाठी खार पोलीस स्थानकात

Archana Banage

हर्षनील प्रतिष्ठानची आर्थिक दुर्बलांसाठी धडपड

Kalyani Amanagi

संततधार पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश

Archana Banage

इचलकरंजीत टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Archana Banage