Tarun Bharat

शाहूवाडीतील परिसरातील दहा गावे लॉक डाऊन करत पोलिसांकडून कसून तपासणी

प्रतिनिधी / शाहुवाडी

शाहूवाडी तालुक्यातील उचत पैकी लहीन गल्ली येथे कोरोना चे तीन रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता घेतली असून परिसरातील दहा गावे लॉक डाऊन केली आहेत. या अनुषंगाने मलकापूर शहरात प्रवेश द्वारावर ही पोलिसांच्या कडून वाहनधारकांची कसून चौकशी सुरू आहे.

Advertisements

उचत पैकी लहिन गल्ली येथे आठ दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 10 गावाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रत्येक माणसाची कसून चौकशी केली जात आहे. तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण रिक्षाचालक असल्याने आणि त्याचा ग्रामीण भागात वावर झाल्याची चर्चा असल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात जाणाऱ्या वाहनधारका बरोबरच अन्य नागरिकांचीही पोलिसांच्या कडून कसून चौकशी सुरू आहे. विनाकारण अथवा कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या यांच्यावर सुद्धा आता चांगलाच लगाम बसला आहे. गेल्या दोन दिवसात नागरिकांनीही संचारबंदीच पालन करण्यास चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक बेफिकीर वागत आहेत. मात्र नागरिकांनीही गांभीर्यं ओळखून काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान तालुक्यात पोलीस बंदोबस्तात ही वाढ करण्यात आली असून सर्व ठिकाणी विशेषता ग्रामीण भागावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केल्याने ग्रामीण भागातही चांगलंच भितीचे वातावरण पसरले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सातत्याने या परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्कतेच्या सूचना देत आहेत.

Related Stories

सातारा : अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, अठरा जण विलगीकरण कक्षात दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार

Abhijeet Shinde

…तर गोकुळची निवडणूक कशाला ?

Abhijeet Shinde

बाप-बेटे जेलमध्ये जाणार; कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू

datta jadhav

नवरात्रोत्सव : गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!