Tarun Bharat

शाहूवाडीतील 14 जण इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन

प्रतिनिधी / कोल्हापूर

‘तबलीग मरकज’च्या काळात दिल्लीत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील 14 जणाची गुरूवारी कोरोना तपासणी केली. त्यानंतर त्यांना पन्हाळा येथे इन्स्टिटय़ूशनल कोरोंटाईन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबांची तपासणी करून त्यांनाही होम कोरोंटाईन केले आहे. दरम्यान, ‘तबलीग’च्या काळात दिल्लीला गेलेल्यांची माहिती तालुका तहसीलदारांनी घ्यावी, संबंधितांची चौकशी करावी, अशी सुचना केल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी सांगितले.

  जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हय़ातून तबलीग मकरजसाठी गेलेल्या, निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास केलेल्यांची यादी प्रशासनाला मिळाली, त्यानुसार 21 जणांना बुधवारी तपासणीनंतर इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन करण्यात आले. गुरूवारी शाहूवाडी तालुक्यातील 14 जण ‘मरकज’च्या काळात दिल्लीत होते, अशी माहिती प्रशासनाला मिळाली. या संशयित 14 जणांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली. त्यांचा होम कोरोंटाईनचा काळ संपला आहे. तरी त्यांना पन्हाळा येथे इन्स्टिटय़ूशनल कोरोंटाईन केले आहे. त्यांच्या कुटुंबांना गावातच होम कोरोंटाईन केल्याचे त्यांनी सांगितले.

 पीपीई कीट तपासणीसाठी समिती स्थापन

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,  कोरोना रूग्ण तपासणीसाठी लागणारे पीपीई कीट इचलकरंजीत बनवण्यास सुरूवात झाली आहे. तात्पुरते आपण 500 कीट सांगलीतून मागवले आहेत. इचलकरंजीत तयार झालेल्या किटची तपासणी आरोग्य विभाग करणार आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीने कीट तपासल्यानंतर सीपीआर देण्यात येणार आहेत.

रक्तदान शिबिरासाठी ब्लड डोनेशन ऍप

जिल्हय़ात रक्तदानासाठी अनेक जण पुढे येत आहेत. पण शिबिरातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने ब्लड डोनेशन ऍप तयार केले आहे. या ऍपमध्ये रक्तदात्याने आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रंमाक, रक्तगट द्यायचा आहे. ऑनलाईन हा फॉर्म भरल्यानंतर गरज लागेल तेव्हा रक्तदात्याला बोलावून रक्तदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी नोंदणीसाठी या ऍपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.

शहरातील रक्तदात्यांची वॉर्डनिहाय यादी केली आहे. लोकांनी रक्तगट माहिती असेल अन् रक्तदान करण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन नोंदणी करावी. आवश्यक रक्तगटाची गरज भासल्यास संबंधितांना बोलावून घेतले जाईल. त्यामुळे गर्दी टाळली जाणार असून कोरोनाचा धोकाही टळणार आहे. त्यासाठी या ऍपचा वापर नागरिकांनी करावा, असे त्यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्यातील चालकाने इचलकरंजी येथील एकाला आपल्या वाहनातून आणले होते. त्या चालकाचा स्वॅब घेतला आहे. त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला होम कोरोंटाईन केले आहे.

जिल्हय़ातील 1150 रेशन दुकानांत धान्यवाटप सुरू

जिल्हय़ात 1600 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी 1150 स्वस्त धान्य दुकानात गुरूवारपासून धान्य वितरणास सुरूवात झाली आहे. नागरिकांना धान्य मिळेल, फक्त त्यांनी गर्दी टाळावी, सोशल डिस्टसिंग पाळून धान्य घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण ; एकुण रुग्णसंख्या ११० तर ३५ जणांची कोरोनावर मात

Archana Banage

शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

Archana Banage

सीमाप्रश्नी आता २३ नोव्हेंबरला सुनावणी

Abhijeet Khandekar

इंधन दरवाढ शेतक-यांच्या मुळावर

Archana Banage

कोल्हापूर : समर्थ साकारणार ‘बाल जोतिबा’ची भूमिका

Archana Banage

ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर

Kalyani Amanagi