Tarun Bharat

शाहूवाडीत सापडला अजून एक कोरोना रुग्ण

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी उचत (ता. शाहूवाडी) येथील चौत्तीस वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाहूवाडीतला तो पहिला, तर जिल्ह्यातील पाचवा कोरोनाग्रस्त आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. मलकापूरपासून पांढरेपाणीकडे जाणाऱ्या मार्गावर उचत हे गाव आहे. संबंधित तरुण हा तबलिगच्या कार्यक्रमास दिल्लीस गेला होता. कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येऊन कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या वडगाव येथील तरुणीचा रिपोर्ट कालच निगेटीव्ह आला होता. त्यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी अखेर निश्वास सोडला होता. परंतु आज शाहूवाडीत रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

सातवे पैकी शिंदेवाडी येथील गॅस्ट्रोची साथ नियत्रंणात : डॉ. सोनिया कदम

Sumit Tambekar

गांधीनगर मुख्य रस्यावरील बेकायदेशीर बांधकामावरील कारवाई टळली

Abhijeet Shinde

‘शिरोली आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा’

Abhijeet Shinde

वारणा दूध संघाची गायीच्या दुधास प्रतिलिटर २ रुपये दरवाढ

Abhijeet Shinde

साऊंड सिस्टीम लावल्याचा कारणातून तरुणाचा भोसकून खून

Abhijeet Shinde

५ हजारांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी जेरबंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!