शाहुवाडी / प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथे गोहत्येचा प्रकार पुढे आला आहे. कालवडींची हत्या करून स्वत:च्या घरात मांसविक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. रघुनाथ केशव फाळके असे या अवैध मासंविक्री करणाऱ्या इसमाचे नाव आहे. शाहूवाडी पोलिसांनी छापा टाकून त्यास अटक केली आहे.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९७,कलम ५(ब), ५(क), ९ प्रमाणे गोहत्या केल्याबद्दल शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास फौ. प्रियांका सराटे करित आहेत.


previous post
next post