Tarun Bharat

शाहूवाडी तालुक्यात दुसऱ्या दिवशी ही शाळा बंदच, मुलं फक्त हजर

Advertisements

दांडीबहाद्दर शिक्षकांची खाबूगिरी थांबणार कधी ?


प्रतिनिधी / शाहुवाडी

शाहूवाडी तालुक्यात सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या असता अनधिकृतपणे  तेरा शिक्षक गैरहजर मुलं फक्त शाळेत हजर तर तीन शाळा कुलूप बंद असल्याचे निदर्शनास आले संबंधित शाळेतील ही विनापरवाना शिक्षक गैरहजर राहिल्याबद्दल सभापती व गट शिक्षणाधिकारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित शिक्षकांच्यावर  कडक कारवाई करावी अशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे. शाहूवाडी तालुक्यात शिक्षण विभागात नेमकं काय चाललं आहे. असाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून पुढे येऊ लागला आहे.

सभापती विजय खोत व प्रभारी गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी संयुक्तरीत्या शाहूवाडी तालुक्यात शाळा तपासणी मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगाने बुधवार 24 फेब्रुवारी रोजी केलेल्या शाळा तपासणीत सहा शाळा या अनाधिकृतपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर संबंधित शाळेतील शिक्षक हीअनधिकृतपणे गैर हजर राहिल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेऊन त्यांची एक दिवसाची बिनपगारी रजा करण्याबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत  सभापती यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.

या दहा शाळेत 13 शिक्षक

विद्या मंदिर बुरंबाळ , कुंभवडे, नवलाईदेवीवाडी, पारी वने, गेळवडे बौद्धवाडी, गेळवडे, मालाई वाडा धनगर वाडा ,पांढरेपाणी, मौसम, या 10 शाळेतील तेरा शिक्षक गैरहजर होते तर शेंबवणे, धुमकवाडी ,व कुभ्यांची वाडी या तीन शाळेला कुलूप लावण्यात आले होते
शाळा बंद शृंखला चालूच

    लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या शाळा शासनाने नियमाचे पालन करून शैक्षणिक सत्र सुरू केले आहे मात्र याला शाहुवाडी तालुका अपवाद ठरू लागला असल्याचे चित्र दिसू लागले आहे बुधवार 24 फेब्रुवारी रोजी सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी केलेल्या तपासणीत सहा शाळेतील शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर राहिले असल्याचे आढळून आले होते तर संबंधित शाळांना कुलूप लावण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील शाळांची तपासणी केली असता सदर शाळांतही अनधिकृतपणे शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले व शाळांनाही कुलूप  असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील लॉकडाउननंतरच्या खरच शाळा सुरू झाल्या आहेत का नाही असा प्रश्न पालकांना पडला असून तालुक्याच्या शिक्षण विभागाचे  नेमक काय चालले आहे याची चर्चा नागरिकातून उमटू लागली आहे.

एकूणच दिवसरात्र काबाडकष्ट करून शाहूवाडी तालुक्यातील अनेक पालक आपल्या पाल्यासाठी राबत आहेत मात्र शाळा बंद ठेवून अनधिकृतपणे दांडीबहाद्दर शिक्षकांची चाललेली ही खाबूगिरी थांबणार कधी असा प्रश्नही पुढे उपस्थित होत आहे दरम्यान या शिक्षकांच्या वर खरंच कारवाईचा बडगा उगारला जाणार का असे ही चर्चा आता पुढे येऊ लागले आहे केवळ जुजबी कारवाई करून या अशा घटनेला   प्रशासन  रोखणार का असा प्रश्नही पालकांच्यांतून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

गोकुळचा उद्या 58 वा वर्धापन दिन

Archana Banage

नवरात्रोत्सवाला आजपासून प्ररंभ

Archana Banage

सतेज पाटील यांना `कॅबिनेट’चे `प्रमोशन’?

Archana Banage

तरुण भारतचे वृत्त ठरले खरे; चंदगडातील शिवसेना शिंदे गटात सामील

Abhijeet Khandekar

सातारा उपकेंद्रात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

Archana Banage

Kolhapur : जळगावचे पोलीस निरिक्षक बकालेंना बडतर्फ करा !

Kalyani Amanagi
error: Content is protected !!