Tarun Bharat

शाहू गव्हर्मेंट बँकेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा, १४ जागांवर विजय

कोल्हापूर / प्रतिनिधी


राजर्षी शाहू गव्हर्मेंट को-ऑप. बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने बाजी मारली आहे. आज झालेल्या मतमोजणीत राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलने १५ पैकी १४ जागांवर विजय मिळवला आहे. तर राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान सत्तारूढ गटाने गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष साजरा केला.

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेसाठीची निवडणूक रविवारी ( दि. १९) रोजी पार पडली. या निवडणुकीत २० हजार ७८८ पैकी ९२४१ मतदारांनी (४४.४५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता . गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या १५ जागांसाठी मतदान झाले. ‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेल’, ‘राजर्षि शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल’ व छत्रपती शिवाजी महाराज युवा पॅनेल, अशी तिरंगी लढत झाल्याने अनेकांच्या नजरा या निकालाकडे लागल्या होते. दरम्यान आज चार वाजता संपूर्ण निकाल स्पष्ट झाला. या निवडणुकीत ‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेलने विजय मिळवला. ‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेलने १५ पैकी १४ जागांवर विजय मिळवत एकतर्फी सत्ता काबीज केली आहे. तर राजर्षी शी स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलने एका जागेवर विजय मिळवला. तर नव्याने स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज युवा पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.

‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेलचे विजयी उमेदवार (मतदान)

सर्वसाधारण गट –

 • विलास शंकरराव कुरणे (४२०४)
 • रमेश गणपती घाटगे (४१४७)
 • सदानंद वसंतराव घाटगे (४१००)
 • अतुल गणपतराव जाधव (४०२३)
 • शशिकांत दिनकर तिवले (४८४७)
 • रवींद्र वसंतराव पंदारे (४५२०)
 • अजित शंकर पाटील (३८९७)
 • मधुकर श्रीपती पाटील (४०८४)
 • रोहित प्रकाश बांदिवडेकर (४०७६)

महिला प्रतिनिधी –

 • हेमा सुभाष पाटील (४५६४)
 • मनुजा शैलेंद्र रेणके (३७४६)

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी –

 • संजय सर्जेराव खोत(४५३६)

अनु. जाती/जमाती प्रवर्ग प्रतिनिधी –

 • किशोर रामचंद्र पोवार (४३९२)

विमुक्त जाती/ भ. जमाती/ विशेष मागास प्रतिनिधी –

 • अरविंद भीमराव आयरे (४३७२०)

राजर्षि शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल विजयी उमेदवार
सर्वसाधारण गट –

 • प्रकाश भीमराव पाटील (३८५६)

Related Stories

महाराष्ट्रात तूर्तास करवाढ नाही : बाळासाहेब थोरात

datta jadhav

उड्डाणपुलामुळे स्थानिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा

Archana Banage

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

Archana Banage

उस्मानाबाद जिल्ह्यात 133 पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर

Archana Banage

”आता एसटी फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार”

Archana Banage

युपी : आणखी दोन दिवस वाढवले लॉकडाऊन!

Tousif Mujawar