Tarun Bharat

शिंगणापूर बंधाऱ्यावर दुचाकी घसरुण एकजण गेला वाहून, शोध सुरू

प्रतिनिधी / वाकरे

शिंगणापूर (ता.करवीर ) येथे भोगावती नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण बंधाऱ्यावर दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातानंतर बंधाऱ्यात पडून वाहून गेला. जयकुमार बाबुराव जाधव ( वय ४०) असे या तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बुडालेल्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे.
 
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की चंबुखडी, गोपाळ वसाहत येथील जयकुमार बाबूराव जाधव  हा तरूण नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडून झाल्यानंतर घरी परतत असताना सकाळी झालेल्या पावसामुळे चिखलात त्याची दुचाकी घसरली आणि तो पाण्यात पडून वाहून गेला. तो वाहत जात असताना काही प्रत्यक्षदर्शीनी पाहिले. अग्निशमन दलाकडून शोधमोहिम सुरू असून दुपारपर्यंत तरूणाचा शोध लागलेला नव्हता.

Related Stories

खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Archana Banage

केळोशी बु॥ येथे विनापरवाना चिखलगुठ्ठा शर्यती; आयोजकावर गुन्हा दाखल

Archana Banage

पंचगंगा स्मशानभूमीच ‘बेवारस’

Archana Banage

Kolhapur; फायनान्स कंपनीत 21 लाखांचा अपहार; दोघांवर गुन्हा

Abhijeet Khandekar

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांचे ‘जंतरमंतर’वर आंदोलन

tarunbharat

हातगणंगले पोलिसाकडून मनोरुग्णास बेदम मारहाण

Archana Banage