Tarun Bharat

शिंगणापूर सुकन्या पै कु शिवांजली शिंदे ने महाराष्ट्रा साठी फडकवला माणदेशी झेंडा

वार्ताहर/ शिखरशिंगणापूर

28 ते 30 डिसेंबर रोजी पन्हाळा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिंगणापूरच्या पै. शिवांजली भारत शिंदे हिने 57 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक व रौप्यपदक मिळवले. तसेच राज्यासाठी ती महिलामल्ल उपविजेता ठरली आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शिंगणापूर ग्रसुकन्या पै. कु शिवांजली शिंदें ने राज्या साठी फडकवला माणदेशी झेंडा अशी प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींच्यातून व्यक्त होत आहे

         पहिल्या कुस्ती मध्ये तिने झारखंडच्या महिलापैलवान नेहाला चित्रपट केले .त्यानंतरच्या कुस्तीमध्ये दिल्लीच्या महिला पैलवान शालिनी वर 7,2 गुणांनी विजय पटकावला.सेमिफायनल मध्ये पंजाबच्या पै सीमा वर 5,4 गुणांनी विजय पटकावल.मात्र फायनल मध्ये झालेल्या कुस्तीमध्ये हरियाणाच्या मुलीकडून तिला पराभव पत्करावा लागला त्यामुळे राज्यस्तरीय महिला कुस्तीस्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक मिळऊन उपविजेती ठरली आहे . सातारा जिह्यातील माण तालुक्याची कन्येने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत माणदेशाचा झेंडा फडकवला आहे .महाराष्ट्र राज्याला दोन नंबरचे पदक संपादन करून दिले.ती सध्या मुरगुड येथील मंडलिक आखाडा येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे तिला सुखदेव येरुडकर,आणि  दादासो लव्हटे मार्गदर्शन करीत आहेत

    शिंगणापूर च्या डॉ भारत शिंदे यांची ती सुकन्या आहे उमाबनातील जिल्हापरिषद शाळेत तिने प्राथमिक शिक्षण घेतले  काहीतरी वेगळे करावयाचे असे ठरवून महिला कुस्तीक्रीडा क्षेत्रात सहभाग घेण्याचा निश्चय घेतला.त्यासाठी कोल्हापूर येथे पुढील शिक्षण व कुस्ती प्रशिक्षण सुरू केले तिच्या मातापित्यांच्या तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मोठे पाठबल दिले.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महिला कुस्तीगीर म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे मोहिच्या ललिता बाबर चा आदर्श समोर ठेऊन भारतासाठी खेळनार असून देशाचे नाव महिला कुस्ती क्षेत्रात गाजवणार असल्याची भावना उपविजेता पै शिवांजली ने आमच्या तरुण भारत प्रतिनिधीकडे व्यक्त केली शिंगणापूर मोही पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे

 

 

Related Stories

बांधकाम विभागात सगळेच गायब

Patil_p

पुसेसावळीत भरारी पथक ऍक्टिव्ह मोडवर……

Patil_p

चुकीने ऑनलाईन ट्रान्सफर झालेले 35 हजार परत केले

Amit Kulkarni

कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बर्निंग कारचा थरार

datta jadhav

नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार फाशीची मागणी

Archana Banage

वडूजला ग्राहक पंचायतीच्या बैठकीत समस्यांचा पाढा

Patil_p