Tarun Bharat

शिंदोळी ग्रामस्थांतर्फे सुवर्णसिंहासनासाठी 1 लाखाचा कर्तव्यनिधी

प्रतिनिधी / बेळगाव

शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थानच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱया 32 मण सुवर्णसिंहासनासाठी कर्तव्य निधीचा ओघ मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. शिंदोळी गावच्यावतीने 1 लाख 1 हजार 101 रुपयाचा धनादेश शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्याकडे सुपूर्द केला.

संभाजीराव भिडे गुरुजींच्या प्रेरणेने स्वराज्यात राजधानी असलेल्या रायगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुवर्णसिंहासन उभारले जात आहे. यासाठी संपूर्ण देशभरातून निधी संकलनाचे काम करण्यात येत आहे. बेळगाव विभागातून अधिकाधिक निधी जमा व्हावा, यासाठी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत आहेत.

शिंदोळी ग्रामस्थांच्यावतीने नुकताच कर्तव्यनिधीचा धनादेश पदाधिकाऱयांकडे देण्यात आला. प्रत्येक गावाने असा आदर्श घेऊन सुवर्णसिंहासनासाठी निधी संकलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, विभाग प्रमुख कपिल पाटील, प्रवीण मुरारी, हिरामणी मुचंडीकर यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कर्तव्यनिधीचा  ओघ सुरूच

हलगा येथील मनोज बाळेकुंद्री यांनी 5 हजार 21 रु., केदनूर येथील किरण पाटील यांनी 1 हजार 111 रु., कंग्राळी खुर्द येथील परशराम मेंडके 2 हजार 500 रु., रोहन बाळेकुंद्री 1 हजार 101 रु., निलजकर परिवारातर्फे 5001 रु., मंडोळी येथील श्रीकांत पाटील यांच्याकडून 5 हजार 555 रु., हंदिगनूर येथील सुदर्शन पाटील यांनी 2 हजार 500 रु., सुळगा (हिं) येथील नागेंद्र पाटील यांनी 1 हजार 1 रुपये शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांकडे धनादेशाच्या स्वरुपात सुपूर्द केले आहेत.

Related Stories

मनपाचे कामकाज ठप्प

Amit Kulkarni

पावसाळी क्रिकेट : कडोली संघाकडे मंगाई चषक

Amit Kulkarni

सोशल क्लबच्या क्रीडाभवनचे उद्घाटन

Amit Kulkarni

सुवर्ण विधानसौधबाहेर जमावबंदीचा आदेश

Omkar B

शिवरायांच्या अवमानाविरोधात खानापुरात काँग्रेसचा निषेध मोर्चा

Amit Kulkarni

चन्नेवाडीजवळील मोरीकडचा रस्ता ढासळला

Amit Kulkarni