Tarun Bharat

शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस् लीग उद्यापासून

ऑनलाइन टीम  / पुणे :  

विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, शिअरफोर्सचे स्पोर्टस लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्टस् लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस. आर.पी.एफ मैदानावर दिनांक ९ ते १२ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया यांनी दिली. 
जितेंद्र पितळीया म्हणाले, स्पर्धेमध्ये पुण्यातील २० महाविद्यालयाचे ७५ संघातील ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८  ते २३ या वयोगटातील मुला-मुलींचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.  स्पर्धेचे यंदा  ९ वे  वर्ष आहे. 
स्पर्धेमध्ये पुण्यातील २० महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डी . वाय  पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी, डी . वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहगाव, अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अलाना  कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, डी . वाय  पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आंबी, ब्रिकस स्कूल ऑफ  आर्किटेक्चर, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर, भारती  विद्यापीठ  कॉलेज ऑफ  आर्किटेक्चर, पी. व्ही पी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डीझाईन, एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, बीकेपीएस, महाराष्ट्र मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, श्री शिवाजी मराठा सोसायटीज कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर, अंजुमन-ए-इस्लाम टेक्निकल कॅम्पस, विदया प्रतिष्ठान इंदापूर कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,एमजेएम कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 

Related Stories

रणजी अंतिम सामन्यावर सौराष्ट्रची पकड मजबूत

Patil_p

आय लीगमधील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

शेली प्रेजरची जलद वेळ

Patil_p

माजी हॉकी प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे निधन

Patil_p

पाकिस्तान-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

Amit Kulkarni

भारताच्या विजयामध्ये हर्षल पटेलची अष्टपैलू खेळी

Patil_p