Tarun Bharat

शिकाऱ्याच्या जाळ्यातून तरसाची सुटका करण्यात वनविभागाला यश

प्रतिनिधी / सातारा :

मालगाव ता. सातारा येथे तरस या वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यात अडकेल्या तरसाला मुक्त करण्यात वनविभागाला यश आले आहे.

वनविभागाने दिलेली माहिती अशी, मालगाव ता. सातारा येथे दि. 15 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वन्यप्राणी तरस यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात हा प्राणी अडकल्याची माहिती वनक्षेत्रपाल डॉ. चव्हाण यांना मिळाली. ते त्यांच्या पथकांसोबत घटनास्थळी पोहचले. या प्राण्याला जाळ्यातून सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतले. सायंकाळी 6.30 वाजता त्यांना यश आले. यासाठी आरईएसक्यु टीम पुणे, डब्लुएलपीआरएस टीम सातारा यांचे सहकार्य मिळाले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वन मजूर गोरख शिरतोडे, हंगामी वनमजूर सुमित वाघ, शैलेश देशमुख यांनी केली. वन्यप्राण्यास पकडण्यासाठी कोणी जाळे टाकत असेल किंवा इतर यंत्र, हत्याराचा वापर करून प्राण्याची शिकार करीत असतील तर वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार हा गंभीर गुन्हा आहे. कोणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये असे आवाहन उपवनसंरक्षण महादेव मोहिते यांनी केले आहे.

Related Stories

काहीचा स्वभाव आम्ही बदलू शकत नाही

Patil_p

सातारा : 31 डिसेंबरला म’श्वर, पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री 10 नंतर मनाई

datta jadhav

बावधनच्या तिघांवर तडीपारीची कारवाई

Patil_p

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुक प्रतिबंधात्मक आदेश जारी

Archana Banage

डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Archana Banage

तीन अल्पवयीन मुलांवर पोक्सोंतर्गंत गुन्हा

Amit Kulkarni