Tarun Bharat

शिक्षकांचा अनुशेष कधी भरणार?

जिल्हय़ात 177 अतिथी शिक्षक भरतीला परवानगी : जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांची माहिती : शाळांची मदार केवळ अतिथी शिक्षकांवर

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक भरतीला एक तप होत आले तरी अद्याप अनुशेष भरण्यात आला नसल्याने शाळांची मदार केवळ अतिथी शिक्षकांवर आहे. शिक्षण खात्याने पुन्हा 177 अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित गटशिक्षणाधिकाऱयांना बजावले आहेत.

राज्यात 2007 आणि 2010 साली शिक्षक भरती झाली होती. त्यानंतर तब्बल बारा वर्षे होत आली तरी शिक्षक भरतीचा अनुशेष (बॅकलॉग) भरण्यात आलेला नाही. परिणामी, बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात बेळगाव आणि खानापूर तालुक्मयातील मराठी शिक्षकांची संख्या अधिक आहे. तसेच रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्मयातही शिक्षकांची कमतरता आहे.

2008 पासून राज्यात अतिथी शिक्षक नियुक्तीला सुरुवात झाल्यानंतरच्या काळात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने शिक्षक भरतीची केवळ घोषणाबाजी केली. त्यातच गेल्या बारा वर्षांत जिल्हय़ातून हजारावर शिक्षक निवृत्त झाले. शिक्षण खात्याने पटसंख्येतील घट हे कारण देत अनेक शाळातील शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. त्यामुळे निवृत्त शिक्षकांच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या घटली असली तरी अनुशेष भरला न गेल्याने अनेक शाळांत विद्यार्थी वाऱयावर पडले आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 1572 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्या टप्प्यात 800 अतिथी शिक्षकांची भरती करण्यात आली होती. पण रिक्त जागांच्या तुलनेत ही भरती अत्यल्प असल्याने पुन्हा जिल्हय़ात 177 अतिथी शिक्षकांच्या भरतीला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिली.

डीएडधारकांची पाठ

मागील काही वर्षात अतिथी शिक्षकांना वेळेत वेतन देण्यात आले नाही. परिणामी बहुतांश डीएडधारक अतिथी शिक्षक म्हणून नियुक्त होण्यास निरुत्साही आहेत. बारा वर्षांपासून अनुशेष भरला जात नसल्याने अनेकांनी वेगवेगळे उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे अतिथी शिक्षक भरतीतही व्यत्यय येत आहे.

आकडे काय सांगतात?

  • राज्यातील रिक्त जागा………. 30,606
  • पहिल्या टप्प्यातील भरती…… 18,000
  • रिक्त जागा……………………. 12,606
  • दुसऱया टप्प्यातील भरती…… 4000

                    बेळगाव                   चिकोडी

  • रिक्त जागा ………….. 1408….. 1935
  • पहिल्या टप्प्यातील भरती ……… 775       1064
  • रिक्त जागा ………….. 633……. 871
  • दुसरा टप्पा         177      244

Related Stories

एनआयआर विवाहावर वेबिनार

Patil_p

सीबीटी बसस्थानकाच्या दुसऱया मजल्याची स्लॅबभरणी

Amit Kulkarni

नेरसा-मणतुर्गा म. ए. समितीची जागृती सभा

Amit Kulkarni

शहरातील मिरवणूक मार्गांचा होणार विकास

Patil_p

बाबुराव ठाकुर कॉलेजचे सामान्यज्ञान स्पर्धेत यश

Amit Kulkarni

धामणे येथील भातगंजी आगीत भस्म

Patil_p