वार्ताहर / म्हैसाळ
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतजी पाटील यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के तसेच यापूर्वी 20 टक्के अनुदान उपलब्ध करून दिलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व तुकड्यांना पुढील वाढीव टप्पा अनुदान देण्यासंदर्भात येणार्या 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करून सदरील प्रश्न निकाली काढला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हा शिक्षक व पदवीधर आमदारांना दिला असल्याची माहिती शिक्षक आमदार दतात्रय सावंत यांनी बोलताना दिली.
भाजप सरकारच्या काळात शिक्षकांच्या अनुदानासंदर्भात लावण्यात आलेल्या जाचक अटी देखील शिथील करण्यात येतील असे ही आश्र्वासन ना .पवार यांनी बैठकीत बोलताना दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले. आदरणीय दादा शब्दांचे फार पक्के आहेत. याचा मी नेहमीच अनुभव घेतलाय. त्यामुळे शिक्षकांच्या अनुदानाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरची बैठकीचे आयोजित करण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे मन:पूर्वक आभार सावंत यांनी मानले . यावेळी आ.बाळाराम पाटील, आ.सतीश चव्हाण , आ.श्रीकांत देशपांडे आदींची उपस्थिती होती.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विविध शिक्षक संघटना नी आंदोलन ने केली आहेत.परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.यासाठी आ सावंत यांनी सातत्याने चर्चा घडवून आणली .या आघाडीच्या सरकारकडून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा शिक्षक संघटना करीत आहेत.


previous post