Tarun Bharat

शिक्षकाचं दातृत्व, शंभर मुली घेतल्या दत्तक

मठ शाळेचे शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा असाही आदर्श

मसुरे येथे मानपत्र देऊन सत्कार

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

जिल्हय़ातील 65 शाळांमधून 100 मुलींना घेतले दत्तक

या कार्यासाठी दिले तीन लाख रुपये

दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:

दातृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही गोष्टी एकत्र पाहणे म्हणजे तसा दुर्मिळ योगायोग. सुदैवाने मूळ आंबोली आणि आता जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. 2 येथे पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावणाऱया चंद्रकांत तुकाराम सावंत यांच्या अंगी हे तिन्ही गुण ठासून भरले आहेत. दातृत्व म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण चंद्रकांत सावंत यांनी अवघ्या वर्षभरात दाखवून दिले. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत संपूर्ण जिल्हय़ातील 65 प्रशालांमधून शैक्षणिक उठावांतर्गत 100 मुली दत्तक घेतल्या आहेत. नुकतीच त्यांनी मसुरे केंद्र शाळेतून 100 वी मुलगी दत्तक घेतली. सावंत यांनी समाजाभिमुख काम व आदर्श उपक्रम म्हणजे काय हे यातून दाखवून दिले आहे. प्रत्येक मुलीमागे तीन हजार रुपये देणगी देत असताना तीन लाख रुपये या कामी त्यांनी खर्च केले आहेत.

 चंद्रकांत सावंत हे नाव जि. प. च्या शैक्षणिक विभागात तसे आदर्श शिक्षक म्हणून चर्चित नाव. गाव, तालुका, जिल्हा, राज्य ते थेट देशपातळीवर विविध मानाचे पुरस्कार मिळविलेले व्यक्तिमत्व. यात जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार 2019, ग्लोबल टिचर्स ऍवॉर्ड, ग्लोबल आयडियल टिचर ऑफ दी ईयर 2019, नॅशनल टिचर इनव्हेशन ऍवॉर्ड, जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकरत्न विशेष पुरस्कार, गुरू सेवारत्न सन्मान आदर्श शिक्षक, नगरवाचन वेंगुर्ले आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार, हिंदी प्रचार सभा वेंगुर्ले, आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार असे विविध राज्य पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्मार्ट डिजिटल शाळेसाठी सहकार्य, कायम बक्षीस ठेव योजनेसाठी सहकार्य, मुलांना शुद्ध पेयजल, हॅण्डवॉश, स्टेशनरीसाठी सहकार्य, खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य, दुखापतग्रस्त शालेय खेळाडूंसाठी रोख रक्कम मदत अशा प्रकारे जिल्हय़ातील विविध शाळांमध्ये त्यांचे शैक्षणिक योगदान सुरू आहे.

माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान!

चंद्रकांत सावंत यांनी 100 मुलींना दत्तक घेऊन अनोखा विक्रमच केला आहे. एखादा जि. प. प्रशालेतील एक शिक्षक असे हिमालयाएवढे कर्तृत्व करतो, हे शिक्षण विभागासाठी भूषणावह आहे. सावंत म्हणाले, 100 मुलींचे दत्तक पालकत्व स्वीकारल्यानंतर खरोखरच मला आज समाधान मिळत आहे. माझ्या जिल्हय़ातील गरीब आणि होतकरू मुलींसाठी मला काही तरी करता आले, याचा आनंद आहे. 100 मुली दत्तक घेणे हे माझे स्वप्न होते आणि ते मी पूर्ण केले. मला माहीत नाही, की हा आकडा कधी थांबेल पण मी समाधानी आहे. माझी समाजाप्रती असलेली आस्था आणि कर्तव्य मी यापुढेही अविरत सुरू ठेवणार आहे. आज ऐतिहासिक अशा मसुरे गावात व जिल्हय़ाला आदर्शवत ठरणाऱया मसुरे केंद्रशाळेची 100 वी मुलगी दत्तक घेतली जाणे हा पण ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

 दोन शाळांतील चार मुली दत्तक

 मसुरे देऊळवाडा जि. प. शाळा प्रशालेतील दोन आणि मसुरे केंद्रशाळेतील दोन  अशी 4 मुली सावंत यांनी बुधवारी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत दत्तक घेतल्या. देऊळवाडा येथे मुख्याध्यापक प्रशांत पारकर, देऊळवाडा सरपंच आदिती मेस्त्राr, विठ्ठल लाकम, विलास मेस्त्राr, सोनोपंत बागवे, संतोष अपराज, प्रशांत भोगले, संतोष परब आणि मसुरे केंद्रशाळा येथे मर्डे सरपंच संदीप हडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, शिवराज सावंत, विलास मेस्त्राr, सुप्रिया परब, बाळू परब, प्रमोद बागवे, विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर, गावडे, ज्योती पेडणेकर, जगदिश चव्हाण, हेमंत बागवे, विनोद सातार्डेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी चंद्रकांत सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. देऊळवाडा व मसुरे शाळा येथे मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन चंद्रकांत सावंत यांचा गौरव करण्यात आला.

  या कार्याची दखल शासनाने घ्यावी!

चंद्रकांत सावंत यांनी जिल्हय़ात केलेल्या कार्याची दखल शिक्षण विभागाने घेणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर नाबाद 100 मुलींच्या पालकांचा यथोचित गौरव होणे गरजेचे आहे. या थोर कार्याची दखल जि. प. प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री, शिक्षण विभागाने घेतली, तरच समाजात अशी दानशूर व्यक्तिमत्वं तयार होतील आणि गरीब, गरजू विद्यार्थ्यांना याचा खऱया अर्थाने लाभ होईल.

Related Stories

‘आम्ही गाबित’अभियानाचा मालवणात शुभारंभ

Anuja Kudatarkar

झोपडीवर तिरंगा फडकवायचा कसा?

Patil_p

निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा

Anuja Kudatarkar

चिपळुणात कृषी विधेयकावरून राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

Archana Banage

सिंधुदुर्गात ‘बर्निंग बोगी’चा थरार

NIKHIL_N

होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे इन्फेक्शन

NIKHIL_N
error: Content is protected !!