Tarun Bharat

`शिक्षक, पदवीधर’ महाविकास आघाडी एकत्र लढणार : सतेज पाटील

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यातील विधान परिषदेच्या पदविधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. पुणे मतदार संघातील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरूवार 5 रोजी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतना दिली.

 राज्यात सत्तेत एकत्रीत असलेल्या महाविकास आघाडीच्यावतीने विधानपरिषदेच्या शिक्षक व पदविधर मतदार संघातील राज्यातील सर्व जागा एकत्रित लढविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहेत. काँग्रेसच्या वाटÎाल कोणती जागा येणार हे अद्याप स्पष्ट नाही. तरीही अचानकपणे निवडणूक जाहीर झाल्याने ऐनवेळी गोंधळ नको, यासाठी तातडीने मुलाखती घेण्यात येत आहेत. वरिष्ठ पातळीवर जागांचे वाटप निर्णय झाल्यानंतर पुढील धोरण ठरेल असे पाटील यांनी सांगितले.

दादांचे टायमिंग चुकले

पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवली ते म्हणाले, निवडणूक लढविण्याची ही वेळ नाही. त्यांचे टायमिंग चुकले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. पुण्यात भाजपामध्ये सुरू असलेल्या राजकीय समिकरणातून देखील त्यांनी हे वक्तव्य केले असेल. आता कोल्हापुरातून निवडणूक लढवायची जरी म्हटले तरी त्यांचा एकही आमदार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी राजीनामा कोण देणार असा प्रश्न आहेच. असा टोला लगावला

Related Stories

शिवाजी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनास प्रारंभ

Archana Banage

महिला विकासासाठी जिल्हा परिषदेच्या योजना राबवू

Archana Banage

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : दसरा-दिवाळी काळात गर्दी रोखण्यासाठी विशेष पथके

Archana Banage

इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना रद्द, दूधगंगेतून पाणी

Archana Banage

Kolhapur; बोगस नळ पाणीपुरवठा कनेक्शन भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी आंदोलन

Abhijeet Khandekar