Tarun Bharat

“शिक्षणातून सद्गुणांचे व मूल्यांचे संवर्धन व्हावे”: सुभाष कवडे

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुभाष कवडे म्हणाले, “शिक्षण म्हणजे केवळ मार्क्स मिळवणे नव्हे शिक्षणातून सद्गुणांचे व मूल्यांचे संवर्धन होत असते. गुणांबरोबर संस्कारही महत्त्वाचे असतात.हे संस्कार कुठेही विकत मिळत नाहीत. सुंदर पुस्तकाच्या पानांपानातून हे संस्कार मिळतात. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून पुस्तक वाचण्याची सवय लावावी. पालकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या हाती सुंदर संस्कारक्षम पुस्तके द्यावीत. नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असताना वाचनाला पर्याय नाही. साबणाने शरीर स्वच्छ होते पण पुस्तकांच्या वाचनाने मनाची स्वच्छता होते. पुस्तके हे मनाचे अन्न आहे. आज सर्वांनी कुप्रवृत्तीविरूद्ध लढण्यासाठी पुस्तकांचा वापरछ शस्त्राप्रमाणे करण्याची गरज आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गौरव करताना वैज्ञानिक दृष्टिकोन व आनंददायी छंद मुलांमध्ये आनंद निर्माण करतात. म्हणून छंद जोपासायला पाहिजेत.हरिपूरची शाळा महापूराने पूर्ण कोलमडलेली असताना विद्यार्थी, शिक्षक, संस्था, ग्रामस्थ यांनी मोठ्या जिद्दीने शाळेला पूर्ववत रूप आणले आहे. या सर्वांच्या जिद्दीला मी सलाम करतो”. यावेळी “श्यामची आई” पुस्तकातील सुंदर कथा सादर केल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जी. आर. कुलकर्णी हे होते तर मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार यांनी स्वागत केले. सांस्कृतिक कार्यक्रमात कु.स्नेहल हणबर हिने सुविचार कु.अर्पिता कदम हिने आण्णा भाऊ साठे यांचे मनोगत कु.सलोनी कागले हिने झांशीच्या राणीचे मनोगत सादर केले. सूत्रसंचालन सौ.वैशाली कणिरे व विठ्ठल मोहिते यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश आहिरे यांनी आभार मानले.याप्रसंगी संस्था कार्यवाह हिंदूराव पाटील, संचालक विजया पाटील,अशोक बोंद्रे, माजी मुख्याध्यापक टी .एस. माळी ,संजय कुंभार,छाया नाईक, गीतांजली आसगांवकर,भारती जीतकर, राजन कारंजकर, यशवंत भगत, प्रसाद बोंद्रे,मिलिंद खंडागळे ,प्रज्ञा म्हेत्रे, आर.जे.पाटील , शिक्षक पालकवर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Stories

सांगली : शांतिनिकेतन अभ्यास केंद्राच्या दोन विद्यार्थीनी महाराष्ट्रात द्वितीय

Archana Banage

विट्यातील कथित अपहरणाचे गूढ उकलले

Abhijeet Khandekar

Kolhapur : विद्यापीठ निवडणुकीत चुरशीने मतदान

Abhijeet Khandekar

कार-कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

Archana Banage

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

Archana Banage

गोटखिंडी फाटा येथील अपघातात हरीपुरच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू….

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!